Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News : आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर प्रशासनाकडून गुन्हे दाखल; नोकरभरतीतील घोटाळे बंद करण्याच्या मागणीसाठी उतरले होते रस्त्यावर

Beed News : बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत विद्यार्थ्यांनी नोकरभरतीतील घोटाळे बंद करण्याची मागणी केली होती

विनोद जिरे

बीड : नोकरभरतीमधील घोटाळे बंद करा व घोटाळेबाजावर कारवाई करा; या मागणीसाठी बीडच्या (Beed) जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्यार्थांनी मोर्चा काढला होता. मोर्चा काढणाऱ्या विद्यार्थ्यावर प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. (Breaking Marathi News)

बीडमध्ये तलाठी भरती परीक्षा रद्द करा असे म्हणत स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आक्रमक झाले होते. या विरोधात बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत विद्यार्थ्यांनी (Student) नोकरभरतीतील घोटाळे बंद करण्याची मागणी केली होती. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नगर रोड मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले होते. यावेळी शेकडो विद्यार्थी या मोर्चामध्ये सहभागी होत घोषणाबाजी केली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गुन्हे दाखल केल्याने संतप्त भावना 

सर्व परीक्षा एमपीएससी (MPSC) मार्फत घेण्यात याव्यात व घोटाळे करणाऱ्यांवरती कायमस्वरूपी कारवाई करावी. अशी मागणी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी शेकडो विद्यार्थी रस्त्यावर बसल्याने रस्ता अडवला म्हणून प्रशासनाने विद्यार्थ्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या विरोधात सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: पालघरमध्ये मध्यरात्री अपघाताचा थरार, रुग्णवाहिकेने तिघांना चिरडलं; दोघांचा जागीच मृत्यू

Hit And Run : प्रसिद्ध अभिनेत्रीनं दुचाकीला ठोकलं अन् घटनास्थळावरून पळाली; अपघाताचा व्हिडिओ समोर

Maharashtra Live News Update: मुंबई -गोवा महामार्गावर सलग 5 व्या दिवशी वाहतूक कोंडी, 4 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा

Stress Control: सावधान! मध्यरा‍त्रीपर्यंत झोप येत नाही, दररोज जागरण होतेय? तर हा गंभीर आजाराचा धोका

Gulab Jam Recipe: खव्याचा गुलाबजाम बनवण्याची सोपी पद्धत, तोंडात टाकताच विरघळेल

SCROLL FOR NEXT