Anganwadi Workers Strike : ५०० अंगणवाडी सेविकांना कारणे दाखवा नोटीस; कर्मचाऱ्यांची मात्र तटस्थ भूमिका

Buldhana News : राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आपल्या विविध मागण्यांसाठी चार डिसेंबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे. अजून तोडगा निघाला नसल्याने संप कायम आहे.
Anganwadi Workers Strike
Anganwadi Workers StrikeSaam tv
Published On

बुलढाणा : अंगणवाडी सेविका आपल्या मागण्यांसाठी मागील दीड महिन्यापासून संपावर गेल्या आहेत. मात्र त्यांच्या मागण्यांबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. यामुळे राज्यातील अंगणवाडी सेविका संपावर ठाम आहेत. संपत सहभागी असलेल्या (Buldhana) बुलढाणा जिल्ह्यातील ५०० हुन अधिक सेविकांना प्रशासनाने करणे दाखवा नोटीस दिली आहे. (Maharashtra News)

Anganwadi Workers Strike
Beed News : निलंबनाचा राग, शिक्षकाने केला महिलेचा विनयभंग; बीडच्या धारुर येथील घटना

राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे (Anganwadi Workers) आपल्या विविध मागण्यांसाठी चार डिसेंबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे. अजून तोडगा निघाला नसल्याने संप कायम आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास पाच हजार कर्मचारी हे संपात सहभागी आहेत. त्यापैकी नवीन नियुक्ती असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास पाचशेच्यावर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Anganwadi Workers Strike
Electric Shock : घराचे बांधकाम करत असताना विद्युत तारेला स्पर्श; बांधकाम व्यवसायिकाचा मृत्यू

सेविकांची तटस्थ भूमिका 

मागण्या मान्य करण्याऐवजी शासनाकडून आमच्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देऊन धमकावल्या जात आहे. मात्र आम्ही कुठल्याही धमक्यांना घाबरणार नाही. मागण्या मंजूर होईपर्यंत आमच्या आंदोलनावर आम्ही ठाम असल्याची भूमिका अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com