Majalgaon Rural Hospital Saam tv
महाराष्ट्र

Majalgaon Rural Hospital : माजलगावमध्ये आरोग्य सेवेचा बोजवारा; ग्रामीण रुग्णालयाची अतिदक्षता विभागाची इमारत धूळखात

Beed News : ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची यंत्रणा काम करत असते. यासाठी शासनाकडून निधी देखील पुरविला जात असतो. अशाच प्रकारे बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आले आहे.

विनोद जिरे

बीड : ग्रामीण भागात आरोग्याच्या चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात सर्व सोयी सुविधा पुरविल्या जात असतात. मात्र बीडच्या माजलगाव ग्रामीण रुग्णालयाचा अतिदक्षता विभागात २ कोटी खर्च करून बांधलेली इमारत धुळखात पडून पडलेली आहे. इतकेच नाही तर येथील एक्स रे व सोनोग्राफी देखील बंद आहेत. 

ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची यंत्रणा काम करत असते. यासाठी शासनाकडून निधी देखील पुरविला जात असतो. अशाच प्रकारे बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आले आहे. तर यात आणखी सुधारणा करत दोन वर्षांपूर्वी अतिदक्षता विभागासाठी स्वतंत्र इमारत उभारण्यात आली आहे. यासाठी तब्बल दोन कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. 

बीडच्या माजलगाव येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात २ वर्षांपूर्वी २ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेली अतिदक्षता विभागाची इमारत सद्यस्थितीला धूळखात पडून आहे. अर्थात बीड जिल्हा रुग्णालयात पोहचण्यापूर्वी लवकर इलाज मिळण्यासाठी माजलगाव येथे हि सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र याठिकाणी अद्याप सेवाच पुरविण्याचे सुरु करण्यात आले नसल्याने परिसरातील रुग्णांना जिल्हा रुग्णालयातच यावे लागत आहे. 

तर याठिकाणी असलेले वैद्यकीय उपकरणे यात एक्स रे, सोनोग्राफी मशीन बंद आहे. त्यामूळे ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा अडचणीचा सामना करावा लागत असून खाजगी रुग्णालयात जात आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे तात्काळ माजलगाव ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय उपकरणे आणि सुविधा सुरू कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT