अभिजित देशमुख
कल्याण : भटक्या कुत्र्यांचा त्रास कमी होत नसून वाढतच आहे. या मोकाट कुत्र्यांकडून लहान मुलांवर हल्ले वारंवार होत असताना कुत्र्यांचा बंदोबस्त केला जात नाही. अशाच प्रकारे कल्याणमध्ये पुन्हा एका चिमुकल्याला लक्ष करत आठ वर्षीय मुलाच्या तोंडाला व गुप्तांगाला मोकाट कुत्र्याने चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे पुन्हा एकदा कल्याण शहर हादरले आहे.
कल्याण पश्चिमेतील बेतूरकरपाडा शिवाजीनगर परिसरात एका आठ वर्षीय मुलावर भटक्या कुत्र्याने हल्ला केला. अर्थव श्रीवास (वय ८) असे या मुलाचे नाव असून त्याच्या गुप्तांग आणि तोंडाला कुत्र्याने चावा घेतल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. टिटवाळा येथील एक फिरस्ती महिलेवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करुन तिचे लचके तोडल्याची घटना ताजी असताना कल्याण पश्चिमेतील बेतूरकरपाडा शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या एका आठ वर्षीय मुलांच्या गुप्तांग आणि तोंडाला भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
कल्याण शहराच्या पश्चिम भागातील बेतूरकरपाडा शिवाजीनगर परिसरात राहणारा अर्थव हा आठ वर्षीय मुलगा मोहिंदर सिंग काबूल सिंग शाळेत दुसरीच्या वर्गात शिकतो. दरम्यान तो ट्यूशन वरून सायंकाळी सहा वाजता घरी परत येत होता. यावेळी घरा जवळच्या गल्लीतून येत असताना त्याच्या मागून आलेल्या भटक्या कुत्र्याने त्याच्यावर झडप घातली. त्याच्या गुप्तांगाला आणि तोंडाला चावा घेतला. या घटनेमुळे मुलगा भयभीत हाेऊन भेदरलेल्या अवस्थेत घरी आला.
घडला प्रकार त्याच्या आईला सांगितला. यानंतर मुलाला तात्काळ महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात नेले. त्यानंतर त्याला कळवा येथे उपचारासाठी नेले होते. कळव्यातून त्याला मुंबईतील शिव रुग्णालयात पाठविले. उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे. मुलाचे वडिल पप्पू श्रीवास यांनी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त महापालिकेने केला पाहिजे; अशी मागणी केली आहे.
तर माजी नगरसेवक मोहन उगले यांनी महापालिका हद्दीत भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. महापालिकेचे कर्मचाऱ्यांनी डॉग व्हॅन कार्यरत करावी; अशी मागणी करुन त्याची दखल घेतली जात नाही.प्रशासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते. अधिकारी एसी केबीनमध्ये बसून काम करतात. महापालिका आयुक्त जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.