Beed News Saam tv
महाराष्ट्र

Shocking News : चॉकलेट चोरल्याचा फक्त संंशय आला, चिमुकल्याला दिली भयंकर शिक्षा, लेकराला बघून आई हादरली!

Beed News : शाळेत गेल्यानंतर दुपारच्या सुट्टीत गावातील एका दुकानात मुलगा गेला होता. त्या ठिकाणी त्याने चॉकलेट चोरल्याच्या संशयावरून दुकानदारानं त्याला भयंकर शिक्षा दिली. बीडच्या केज तालुक्यात ही भयंकर घटना घडली.

विनोद जिरे

बीड : चॉकलेट चोरल्याच्या संशयावरून एका लहान मुलास कपड्याच्या सहाय्याने झाडाला बांधण्यात आले होते. हा धक्कादायक प्रकार बीडच्या केज तालुक्यातील येवता या गावात घडला असून या प्रकरणी तीन जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

येवता (ता. केज) येथील बाळू गायकवाड असं त्या मुलाचे नाव आहे. (Beed News) बाळू हा इयत्ता तिसरीच्या वर्गात शिक्षण घेतो. शाळेत गेल्यानंतर दुपारच्या सुट्टीत गावातील एका दुकानात तो गेला होता. त्या ठिकाणी त्याने चॉकलेट चोरल्याच्या संशयावरून सदरील दुकानदार महिलेने त्याला कपड्याच्या सहाय्याने झाडाला बांधून ठेवले होते. दुपारच्या सुट्टीत मुलगा घरी न आल्याने त्याच्या आईने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु तो मिळून आला नाही. 

दरम्यान याबाबतची माहिती घरच्याना मिळाल्यानंतर बाळूची सुटका करण्यात आली. घडल्या प्रकाराबाबत बाळूने सर्व हकीकत सांगितल्यानंतर या प्रकरणात तिन जणाविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत (Police) पोलिसांकडून तपास सुरु आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाडक्या बहि‍णींसाठी खूशखबर; नागपुरातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गेमचेंजर घोषणा

नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती, कधी होणार मतदान?

Friday Horoscope : पैशांची चिंता मिटणार,लक्ष्मी प्रसन्न होणार; ५ राशींच्या लोकांसाठी शुक्रवार गेमचेंजर ठरणार

Pune Politics: आरोप सिद्ध नाही झाले तर राजकारण सोडा; मुरलीधर मोहोळ यांचे अजित पवारांना "ओपन चॅलेंज"

भारत-कंबोडिया ते व्हिएन्टिन, दररोज व्हायची मारहाण; किडनी विकलेल्या शेतकऱ्याने मांडली व्यथा, काँग्रेस मदतीला धावली

SCROLL FOR NEXT