Beed Lok Sabha Saam tv
महाराष्ट्र

Beed Lok Sabha : बीडमध्ये मविआ उमेदवाराकडून बोगस मतदानाची तक्रार; फेर मतदान घेण्याची मागणी

विनोद जिरे

बीड : लोकसभा निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्यातील मतदान १३ मे रोजी पार पडले. यात बीड (Beed) लोकसभा मतदार संघात देखील मतदानाची प्रक्रिया पार पडली. मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे (Bajarang Sonawane) यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे बोगस मतदान झाल्याची तक्रार करत काही मतदान केंद्रांवर फेर मतदान घेण्याची मागणी केली आहे. 

बीड लोकसभा मतदार संघात सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली. या मतदार संघामध्ये रेकॉर्डब्रेक मतदान झाल्याचे दिसत असून यानंतर आता (Mahavikas Aaghadi) मविआचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. यामध्ये परळी तालुक्यातील दहा, केज (Kej) तालुक्यातील दोन, माजलगावमधील एक, धारुर मधील चार आणि आष्टी व पाटोद्यातील प्रत्येकी एका गावात इन कॅमेरा फेर मतदान घ्यावे, (Lok Sabha election) अशी मागणी केली आहे. 

मतदानापासून वंचित ठेवल्याचा आरोप  

या गावांमध्ये मतदान केंद्र ताब्यात घेवून बोगस मतदान केल्याचा आरोप या पत्रात केला आहे. तसेच धर्मापुरी या गावातील काही मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचे देखील म्हटले असून आता या पत्रावर निवडणूक निर्णय अधिकारी काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: अखेर ठरलं! मविआचा जागा वाटपाचा तिढा सुटला, १००-८०-८० फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब

Maharashtra News Live Updates: भाजपचे अनेक नाराज पदाधिकारी आज ठाकरेंची मशाल घेणार

BMC Job: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; मिळणार १४२००० पगार; असा करा अर्ज

Salman Khan News: 'बाबा सिद्दीकींपेक्षा वाईट हाल...', सलमान खानला पुन्हा धमकी; ५ कोटींची मागणी

Shocking Video: कशासाठी? पोटासाठी..! चार पैसे कमावण्यासाठी जीव धोक्यात, मजुराचा VIDEO पाहून विचारात पडाल

SCROLL FOR NEXT