Ratnagiri Water Crisis : रत्नागिरीला पाणी टंचाईच्या झळा तीव्र; दोन दिवसांआड येतोय टँकर

Ratnagiri News : राज्यात कमी पावसामुळे पाणी टंचाईची भीषणता अधिक जाणवत आहे. मार्च महिन्यापासूनच गावांमध्ये पाण्याची तहान टँकरद्वारे भागविली जात आहे.
Ratnagiri Water Crisis
Ratnagiri Water CrisisSaam tv

अमोल कलये 

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात पाणी टंचाईची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. उन्हाची तीव्रता वाढत असताना पाणी टंचाईची तीव्रता देखील वाढत (Ratnagiri) आहे. सद्यस्थितीला ६१ गावांतील १५८ वाड्यांना केवळ ११ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. या अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे जिल्ह्यातील ४३ हजार ९६० लोक हैराण झाले आहेत. 

Ratnagiri Water Crisis
Akola Crime : उसनवारीच्या पैशावरून जोरदार राडा; अकोल्यात दोन गट भिडले, ९ जण जखमी

राज्यात कमी पावसामुळे पाणी टंचाईची (Water Scarcity) भीषणता अधिक जाणवत आहे. मार्च महिन्यापासूनच गावांमध्ये (Rain) पाण्याची तहान टँकरद्वारे भागविली जात आहे. काही भागात तर दिवसेंदिवस भीषणता अधिक गंभीर होत असून टँकरची संख्या देखील कमी पडू लागली आहे. यामुळे ग्रामस्थांना पाणी समस्या भेडसावत आहे. काही गावांमध्ये महिलांना पायपीट करत पाणी आणावे लागत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. यंदाचा मान्सून लांबल्यास पाणी समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता देखील आहे. 

Ratnagiri Water Crisis
Dombivali Crime : खुनाच्या गुन्ह्यातुन सुटताच सुरु केली चेन स्नेचिंग; डोंबिवली मानपाडा पोलिसांनी घेतले ताब्यात

दोन दिवसाआड टँकर 

जिल्ह्यात यंदा उष्मा अधिक वाढलेला असल्याने पाण्याची पातळी खालावल्याने तलाव, विहिरी, विंधन विहिरी आटल्या आहेत. त्याचा परिणाम जिल्ह्यात करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यावर झाला आहे. त्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली असून टंचाईग्रस्तांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. हा पाणीपुरवठा दोन ते तीन दिवसांतून एकदा टँकरने केला जातोय. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com