Bhagwangad Dasara Melava Pankaja Munde Saam TV
महाराष्ट्र

Dasara Melava : भगवानगडावरील दसरा मेळाव्याला विरोध; पंकजा मुंडेंच्या भूमिकेकडे लक्ष

भगवानगडावर दसरा मेळावा घेऊ नये, असा ठराव भगवानगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गावांनी घेतला आहे.

विनोद जिरे

Bhagwangad Dasara Melava : भगवान गडावर (Bhagwangad) दसरा मेळावा घेण्यावरून पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता आहे. कारण, भगवानगडावर दसरा मेळावा (Dasara Melava) घेऊ नये, असा ठराव भगवानगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गावांनी घेतला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील खरवंडी, मालेवाडी आणि बीड जिल्ह्यातील घोगस पारगाव या गावांनी हा ठराव घेतला आहे. (Pankaja Munde Dasara Melava News)

2015 साली पंकजा मुंडेंना (Pankaja Munde) भगवान गडावर दसरा मेळावा घेण्यास महंत नामदेव शास्त्री यांनी विरोध केला होता. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी भगवान गडाचे महंत नामदेव शास्री यांना भावनिक पत्र लिहून ‘गडावर मेळाव्यासाठी फक्त 20 मिनिटांची परवानगी द्या’ असं आवाहन केलं होतं. आता यावर्षीचा दसरा मेळावा कृती समितीने इथेच मेळावा घेण्याचं जाहीर केलं. आणि पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा चर्चेत आला.

मात्र भगवानगडावर दसरा मेळावा घेऊ नये, असा ठराव भगवान गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गावांनी घेतला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील खरवंडी, मालेवाडी आणि बीड जिल्ह्यातील घोगस पारगाव या गावांनी हा ठराव घेतला आहे. गडाच्या पाच किलोमीटर अंतरावर कोणताही दसरा मेळावा घेऊ नये, असं या पत्रकात म्हटल आहे. (Bhagwangad Dasara Melava News)

संत भगवान बाबांच्या गडावर कुठल्याही प्रकारचा सामाजिक, राजकीय दसरा मेळावा आणि भाषणास प्रतिबंध घालण्यात यावा. परंपरेनुसार दसऱ्याच्या दिवशी केवळ संत भगवान बाबा समाधीचे दर्शन आणि सीमोल्लंघन यासाठीच भाविकांना परवानगी द्यावी, असा ठराव यावेळी घेण्यात आलाय. याबाबत पंकजा मुंडे यांनी कोणतीही भूमिका माध्यमांसमोर मांडलेली नाही.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: जालन्यातील बदनापूर तालुक्यातील पाडळी शिवारात मुसळधार पाऊस

Maharashtra Government: सरकार शेतकऱ्यांना देणार गुड न्यूज: मुख्यमंत्री लवकरच पूर्ण करणार राज्यातील बळीराजाची मोठी मागणी

Mumbai Local: मध्य रेल्वेला पावसाचा फटका, लोकलसेवा उशिराने; घराकडे निघालेल्या प्रवाशांचे हाल

थँक्स माय फ्रेंड! रशियाच्या पुतिन यांच्या फोननंतर PM मोदींनी मानले आभार, ट्रम्प काय म्हणाले सगळं काही सांगितलं!

Crime : कानशिलात लगावल्याने बायको भडकली, रागाच्या भरात नवऱ्याचा प्रायव्हेट पार्टच कापला

SCROLL FOR NEXT