ATM Crime
ATM Crime Saam tv
महाराष्ट्र

ATM Crime: एटीएम कार्डची आदलाबदल करून ९७ हजारांचा गंडा

विनोद जिरे

बीड : बीडच्या अंबाजोगाई एटीएमवर पैसे काढता येत नसल्याने एटीएम कार्ड अनोळखीच्या हाती सोपविणे एकास अंगलट आले आहे. एका भामट्याने एटीएम कार्डची (ATM Card) आदलाबदल करून तब्बल ९७ हजारांना गंडा घातला आहे. (Breaking Marathi News)

मोरेवाडी (ता. अंबाजोगाई) येथील दिवाकर भगवान दळवे असे फसवणूक झालेल्या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. ते एसटी महामंडळाचे निवृत्त चालक आहेत. ८ नोव्हेंबरला ते पैसे काढण्यासाठी शहरातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएमवर गेले होते. पैसे काढता येईना म्हणून तेथे उभ्या असलेल्या अनोळखी व्यक्तीच्या हाती त्यांनी एटीएम कार्ड सोपविले.

कार्डाचा पिनही विचारला

त्याने पिन क्रमांक जाणून घेतला व कार्डची आदलाबदल केली. त्यानंतर खात्यातून ९७ हजार रुपये काढून घेतले. दरम्यान दळवे यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Summer Health: घामोळ्या, पुरळसारख्या समस्यांवर रामबाण उपाय; त्वाचेच्या सर्व समस्या होतील गायब

Kshitij Zarapkar : अभिनेते क्षितीज झारापकर यांचं कर्करोगाने निधन; वयाच्या ५४ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

ICC Champions Trophy: 'टीम इंडियाला पाकिस्तानात यावंच लागेल, अन्यथा...' माजी पाकिस्तानी खेळाडूची वॉर्निंग

Kalyan Crime News: तहान लागल्याने पाणी प्यायला गेली, नराधमानं संधी साधली; कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

India's Smallest Village: भारतातील सर्वात लहान गाव तुम्हाला माहिती आहे का?

SCROLL FOR NEXT