Jalgaon News: तीन वर्षात परिवार गमावला; मुलगी अन पतीपाठोपाठ मुलानेही सोडले प्राण

तीन वर्षात परिवार गमावला; मुलगी अन पतीपाठोपाठ मुलानेही सोडले प्राण
Jalgaon News
Jalgaon NewsSaam tv

पहूर (जळगाव) : मुलगी आणि पतीपाठोपाठ जगण्याचा आधार असलेल्या एकुलत्या एक मुलाचाही मृत्यू झाल्याने दुर्देवी मातेवर दुःखाचा डोंगर कोसळल्याची घटना (Jalgaon News) पहूर येथे घडली. (Maharashtra News)

तीन वर्षांपूर्वी मुलगी रोहिणी अठरा वर्षांची असताना अपस्मार आजाराने मृत्युमुखी पडली. दीड वर्षांपूर्वी पती मनोज रमेश सोनवणे यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. मुलगी आणि पती गमावल्याचे दुःख उराशी कवटाळत जगण्याचा आधार असलेल्या एकुलत्या एक मुलाला शिकवून बँकेत अधिकारी बनवावं, असे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या मातेला मात्र त्याच्याच अंत्ययात्रेत मंगल अक्षता टाकण्याची दुर्दैवी वेळ आली. ही हृदयस्पर्शी कहाणी आहे पहूर कसबे येथील रहिवासी रंजना मनोज सोनवणे यांची. शनिवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास त्यांचा मुलगा रघुवीर मनोज सोनवणे (वय १९) याचे अपस्मार आजाराने निधन झाले. गेल्या अडीच महिन्यांपासून तो अंथरुणावर खिळून होता.

Jalgaon News
Nashik News: भरदिवसा लुटीच्‍या उलगड्याने पोलिसही अवाक; नाशिकमधील लुटीचे सत्‍य आले समोर

उपचारासाठी विकले शेत

कोरोनाची लागण झाल्याचे कळतात पतीला वाचविण्यासाठी अल्पभूधारक रंजना सोनवणे यांनी सगळी शेती विकून उपचार केले. परंतु दुर्दैवाने पतीचे प्राण वाचवू शकल्या नाहीत. मुलगी आणि पती वियोगाचे दुःख उराशी कवटाळून मुलगा रघुवीर यास बँकेत अधिकारी बनविण्याचे त्यांचे स्वप्न होते. परंतु नियतीला ते मान्य नसेल म्हणून की काय आज सकाळी सव्वाच्या सुमारास रघुवीरने प्राण सोडले.

अंत्यविधीत मंगलाष्टके

रंजना सोनवणे यांनी मुलगा रघुवीर याला बरे करण्यासाठी मोलमजुरी करून जळगाव, औरंगाबाद, मुंबई येथील दवाखान्यांमध्ये उपचार केले. परंतु, त्‍याचा अखेर मृत्‍यू झाला. मृत्यूपश्चात रघुवीरचे सुपारीशी लग्न लावण्यात आले. या वेळी टाहो फोडत दुर्दैवी आई रंजना सोनवणे यांनी भरल्या डोळ्यांनी अक्षता टाकल्या. अंत्ययात्रेसमयी मंगलाष्टकाचे स्वर कानी येताच उपस्थितांची मने हेलावून गेली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com