Beed News Saam tv
महाराष्ट्र

जायकवाडी धरणातून 76 हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग; 58 गावांना संभाव्य पुराचा धोका

जायकवाडी धरणातून 76 हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग; 58 गावांना संभाव्य पुराचा धोका

विनोद जिरे

बीड : पैठणच्या जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. धरण 95 टक्क्यांपेक्षा जास्त क्षमतेने भरले आहे. यामुळे या धरणातून (Godavari River) गोदावरी पात्रात 76 हजार क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीला मोठा पुर आल्‍याने माजलगाव (Majalgaon) तालुक्‍यातील ५८ गावांना संभाव्‍य पुराचा धोका वर्तविला आहे. (Beed News Jayakwadi Dam)

गोदावरी नदीला पूरस्थिती निर्माण (Beed) झाली असून देशातील साडेतीन शक्तीपीठापैकी एक असणाऱ्या गेवराई तालुक्यातील श्री क्षेत्र राक्षसभुवन येथील शनी मंदिराचा एक मजला पूर्णतः पाण्याखाली गेला आहे. तर दुसरीकडे पांचाळेश्वर येथील दत्त मंदिर देखील पूर्णतः पाण्याखाली गेले आहे.

प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

दरम्यान बीडच्या गेवराई तालुक्यातील 32 आणि माजलगाव तालुक्यातील 26 अशा 58 गोदावरी नदीकाठच्या गावांना संभाव्य पुराचा धोका आहे. यामुळे प्रशासनाने या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून नदीपात्रात उतरू नका असं आवाहन गेवराईचे तहसीलदार सचिन खाडे यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धाराशिवच्या भुम तालुक्यात तब्बल 200 पेक्षा जास्त एकरावरील ऊस जळुन खाक

Diabetes Diet : डायबिटीजवर रामबाण उपाय, भात-पोळीऐवजी खा 'हे' पदार्थ; रक्तातील साखर होईल झटक्यात कमी

World's Fastest Spider: माणसापेक्षा वेगाने धावणारा Spider पाहिलाय का?

Gokul President Election 2026 Court Hearing: गोकुळ सत्तासंघर्षावर जोरदार युक्तीवाद; कोणाच्या बाजुने निकाल लागणार? कोर्टात काय घडलं?

BSNL Recharge Plans : मोठी बातमी! फक्त ₹१७२ मध्ये महिनाभर बिनधास्त कॉलिंग! पाहा कोणता प्लॅन फायदेशीर

SCROLL FOR NEXT