World's Fastest Spider: माणसापेक्षा वेगाने धावणारा Spider पाहिलाय का?

Bharat Jadhav

13 km/h चा वेग

शास्त्रज्ञांनी जगभरातील कोळ्यांच्या २५८ प्रजातींच्या गतीचा अभ्यास केला आणि असे आढळले की, काही कोळी थक्क करणाऱ्या वेगाने धावतात. जगातील सर्वात वेगवान कोळी 'ऑस्ट्रेलियन हंट्समॅन' हा आहे; तो प्रति सेकंद ३.५९ मीटर (सुमारे १३ किलोमीटर प्रति तास) इतक्या वेगाने धावते.

World's Fastest Spider: Australian Huntsman Runs At 13 Kmph

माणसाच्या चालण्याच्या गतीपेक्षाही अधिक

हा वेग माणसाच्या जलद चालण्याच्या गतीपेक्षाही अधिक असतो. हे कोळी क्षणार्धात आपल्या शिकारीपर्यंत पोहोचू शकतात. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, वेगाच्या बाबतीत हा कोळी माणसांनाही मागे टाकू शकते.

World's Fastest Spider: Australian Huntsman Runs At 13 Kmph

शरीराचा आकारावर अवलंबून असते गती

'डेली मेल'च्या एका अहवालानुसार, शास्त्रज्ञांना असे आढळले आहे की कोळी प्राण्यांचा वेग त्यांच्या शरीराचा आकार, पायांची लांबी आणि शिकार करण्याच्या पद्धतींवर अवलंबून असतो. हा वेग त्यांना शिकार पकडण्यासाठी, शत्रूंपासून बचाव करण्यासाठी आणि कठीण परिस्थितीत जिवंत राहण्यासाठी मदत करतो.

World's Fastest Spider: Australian Huntsman Runs At 13 Kmph

२५८ प्रजातींचा डेटा

एका संशोधन प्रकल्पादरम्यान शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेतील मोजमापांची उपलब्ध डेटाशी सांगड घालत कोळी प्रजातींच्या धावण्याच्या क्षमतेबाबतचा आतापर्यंतचा सर्वात मोठा डेटासेट तयार केलाय. यात २५८ प्रजातींचा समावेश आहे.

World's Fastest Spider: Australian Huntsman Runs At 13 Kmph

सर्वात हळू धावणारी कोळी

एका अभ्यासानुसार, कोळ्याचा धावण्याचा वेग त्याच्या शरीराच्या वस्तुमानानुसार वाढत जातो. या संशोधनात केवळ १.५ मिमी लांबीचा 'मनी स्पायडर' (money spider) सर्वात संथ असल्याचं आढळलंय. ही कोळी प्रति सेकंद ०.०१८ मीटर इतक्या वेगाने हालचाल करते.

World's Fastest Spider: Australian Huntsman Runs At 13 Kmph

सर्वात वेगवान कोळी

ऑस्ट्रेलियातील 'हंट्समन' कोळी हा जगातील सर्वात वेगवान कोळी ठरला असून, तो प्रति सेकंद ३.५९ मीटर सुमारे ८ मैल प्रति तासवेगाने धावू शकते.

World's Fastest Spider: Australian Huntsman Runs At 13 Kmph

हेही वाचा

येथे क्लिक करा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

World's Fastest Spider: Australian Huntsman Runs At 13 Kmph
दररोज इस्त्री केलेले कपडे घालावे की नाही? आरोग्याशी काय आहे संबंध?