Bharat Jadhav
इस्त्री केलेले कपडे घातल्यानं माणूस केवळ नीटनेटका आणि आकर्षक दिसतो, असा बहुतेकांचा समज असतो. पण इस्त्री करणं हे केवळ स्टाईल किंवा फॅशनपुरते मर्यादित नसून, त्याचा आपल्या आरोग्याशी थेट संबंध असतो.
इस्त्री केलेल्या कपड्यांमुळं कपड्यांवरील सर्व चुरगळलेपणा आणि सुरकुत्या क्षणात नाहीशा होतात. यामुळे कपडे ताजेतवाने दिसतात आणि तुमचा लूक अधिक आकर्षक वाटतो.
कपडे धुतल्यानंतर त्यांच्या धाग्यांची मूळ रचना सैल पडते. योग्य तापमानावर इस्त्री केल्याने कपड्यांचे फॅब्रिक व्यवस्थित सेट होते. यामुळे कपड्यांचा पोत आणि रंग दीर्घकाळ चांगला टिकून राहतो.
दररोज सर्वच कपड्यांना इस्त्री करणे शक्य नसेल, तर किमान बाहेर घालण्याच्या कपड्यांना नियमित इस्त्री करावी.
कपडे डिटर्जंट पावडर किंवा साबणाने स्वच्छ धुतो आणि उन्हात वाळवतो. कपडे धुतले म्हणजे ते १०० टक्के स्वच्छ झाले. परंतु, धुतल्यानंतर आणि हवेत वाळल्यानंतरही कपड्यांच्या धाग्यांमध्ये काही अदृश्य गोष्टी शिल्लक राहतात, ज्या साध्या डोळ्यांनी दिसत नाहीत.
इस्त्रीचा सर्वात मोठा आणि खरा फायदा म्हणजे 'जंतू आणि बॅक्टेरियांचा नाश'. इस्त्री करताना निर्माण होणाऱ्या प्रचंड उष्णतेमुळे कपड्यांच्या धाग्यांमध्ये लपलेले सूक्ष्म जिवाणू, बॅक्टेरिया आणि कीटकांची अंडी पूर्णपणे नष्ट होतात.