Beed CCTV Saam Tv
महाराष्ट्र

Beed Bus Stop Video: बसमध्ये चढताना महिलेसोबत घडला धक्कादायक प्रकार; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

Beed Bus Stop Theft Video: तीन महिलांनी अतिशय शिताफिने बसमध्ये चढणाऱ्या प्रवासी महिलेच्या बॅगेतले पैसे चोरले आहेत.

Priya More

Beed Police : बीडमध्ये चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अशीच एक घटना बीडच्या नेकनुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. तीन महिलांनी अतिशय शिताफिने बसमध्ये चढणाऱ्या प्रवासी महिलेच्या बॅगेतले 50 हजार रुपये चोरल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या नेकनुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांचा धुमाकूळ सुरुच आहे. पुन्हा एक चोरीची घटना समोर आली आहे. बीडच्या चौसाळा बस स्थानकातून एलआयसीचे पैसे भरण्यासाठी निघालेल्या प्रवासी महिलेचे 50 हजार रुपये चोरीला गेल्याची घटना घडली आहे. ही चोरीची घटना बसस्थानकावर लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

चोरीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, चौसाळा बसस्थानकावर एक एसटी आली आहे. या एसटीमध्ये चढण्यासाठी प्रवासी मोठी गर्दी करतात. या गर्दीचा फायदा घेत तीन महिला चोरी करतात. अतिशय शिताफीने आधी बसमध्ये चढण्याचे नाटक करतात. नंतर त्या एका महिलेच्या बॅगेतले 50 हजार रुपये चोरतात. सर्व प्रवासी बसमध्ये चढल्यानंतर या तीन महिला पळ काढतात.

या चोरीच्या घटेनमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्यान तात्काळ चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सामान्य नागरिकांमधून होत आहे. मागील आठ दिवसांत नेकनुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत 6 चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ६५ वर्षांवरील अन् २१ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील महिलांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; या जिल्ह्यातील ९८ हजार महिलांची पडताळणी होणार

Ajit Pawar Funeral Baramati Live Updates : शरद पवार काटेवाडी येथे अजित पवारांच्या निवासस्थानी पोहचले

Maharashtra Live News Update : अजित पवार यांचे पी एस ओ विदीप जाधव यांच्यावर त्यांच्या मूळ गावी होणार अंत्यसंस्कार

Ajit Pawar Plane Crash: दृश्यमानता ३ किमीपर्यंतची तरीही पायलटला रनवे दिसला नाही? विमान अपघाताबाबत मोठा खुलासा

Myra Vaikul: लहान वयात ट्रोलिंग नको! मायरा वायकुळच्या पालकांचा धाडसी निर्णय

SCROLL FOR NEXT