Vidhan Sabha Election Saam tv
महाराष्ट्र

Vidhan Sabha Election : मराठवाड्यात मनसेच्या हाती भोपळा; १७ उमेदवारांना मिळून २९ हजार २८६ मते

Beed News : राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणूक सुरवातीला अगदी चुरशीची होईल असेच चित्र सर्व मतदारसंघांमध्ये पाहण्यास मिळत होते. मात्र निकाल जाहीर झाल्यानंतर मतदारांनी महायुतीला स्पष्ट बहुमत दिल्याचे दिसून आले आहे.

विनोद जिरे

बीड : एकेकाळी मराठवाड्यात आमदार आणि नगरसेवक असणाऱ्या मनसेला या विधानसभा निवडणुकीमध्ये धुळ खावी लागली आहे. मराठवाड्यातील ८ पैकी ७ जिल्ह्यात मनसेकडून १७ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आले होते. मात्र यापैकी एकाही ठिकाणी मनसेला यश मिळाले नाही. तर या सर्व उमेदवारांना मिळून २९ हजार २८६ मतांवरच समाधान मानावे लागले अन् मनसेच्या हातामध्ये विधानसभेत भोपळा आला.

राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणूक (Vidhan Sabha Election) सुरवातीला अगदी चुरशीची होईल असेच चित्र सर्व मतदारसंघांमध्ये पाहण्यास मिळत होते. मात्र निकाल जाहीर झाल्यानंतर मतदारांनी महायुतीला स्पष्ट बहुमत दिल्याचे दिसून आले आहे. अर्थात महाविकास आघाडीतील पक्षांसह राज्यातील सर्वच पक्षांत निराशा पाहण्यास मिळाली. यात महाराष्ट्र्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) उमेदवारांना मतदारांचा कौलच राहिला नाही. केवळ मराठवाडाच नाही तर राज्यात एक देखील आमदार आता मनसेचा राहिलेला नाही. 

केवळ सभांना गर्दी 
ज्यावेळेस मनसे पक्ष नव्याने सुरू करण्यात आला होता. त्यावेळेस मराठवाड्यासह महाराष्ट्रात मनसेची क्रेझ पाहायला मिळाली होती. त्याचबरोबर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला रेकॉर्ड ब्रेक गर्दी असल्याचे देखील पाहायला मिळत होते. तर दुसरीकडे हीच रेकॉर्ड ब्रेक गर्दी आजही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेमध्ये पाहायला मिळते. मात्र या रेकॉर्ड ब्रेक गर्दीचे मतात रूपांतर होताना अद्यापही पाहायला मिळालं नाही. 

सपशेल निराशा 

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसे स्वबळावर लढली. मात्र या निवडणुकीत मनसेला यश न आल्याचे पाहायला मिळालं. विशेष म्हणजे मराठवाड्याचे केंद्रस्थान असणाऱ्या संभाजीनगर मध्य विधानसभा मतदार संघातील उमेदवाराला अवघे ११४५ मते पडली. यामुळे आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह मनसेच्या नेत्यांना आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचं राजकीय वर्तुळातून बोललं जात आहे.

१७ उमेदवारांना केवळ २९ हजार मते 

विधानसभा निवडणुकीत अनेक मात्तबरांच्या पदरी निराशा पडल्याचे पाहण्यास मिळाले. यात मनसेमधील उमेदवारांचा देखील समावेश आहे. त्यानुसार मराठवाड्यात कोणत्या मतदार संघात उमेदवार उभे केले आणि या ठिकाणी त्यांना किती मते पडली हे महत्वाचे आहे. अर्थात मनसेकडून मराठवाड्यात १७ उमेदवार मैदानात उतरले होते. मात्र मराठवाड्यातील या १७ उमेदवारांना मिळून केवळ २९ हजार २८६ मते मिळाली आहेत. 

मनसेने लढवलेल्या जागा व मिळालेली मते
- बीड - एकूण विधानसभा : 4, उमेदवार : 4, एकूण मिळालेली मते : 7247
- नांदेड - एकूण विधानसभा : 9, उमेदवार : 2, एकूण मिळालेली मते : 1368
- परभणी - एकूण विधानसभा : 4, उमेदवार : 2, एकूण मिळालेली मते : 3465
- हिंगोली - एकूण विधानसभा : 3, उमेदवार : 1, एकूण मिळालेली मते : 2287
- लातूर - एकूण विधानसभा : 4, उमेदवार : 3, एकूण मिळालेली मते : 6441
- संभाजीनगर - एकूण विधानसभा : 9, उमेदवार : 3, एकूण मिळालेली मते : 5583
- उस्मानाबाद - एकूण विधानसभा : 4, उमेदवार : 2, एकूण मिळालेली मते : 2895

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोपा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT