चाकण (पुणे) : पुण्याच्या चाकण एमआयडीसी परिसरातील गावात अनधिकृतपणे डिझेलचा साठा करून ठेवल्याची माहिती प्रशासनाला मिळाला होती. या माहितीच्या आधारे याठिकाणी छापा टाकण्यात आला असून मोठ्या प्रमाणात डिझेलचा साठा आढळून आला आहे. यामुळे खळबळ उडाली असून येथून सुमारे ३ हजार ६०० लिटर इतका डिझेलचा साठा जप्त करण्यात आला आहे.
पुण्याच्या (Pune News) चाकण औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या निघोजे गावच्या हद्दीत अनधिकृतपणे डिझेलचा साठा करून ठेवण्यात आला होता. याठिकाणी डिझेल साठवून विना परवाना मशीनद्वारे मिसळून ते कंटेनरमध्ये भरण्याचा प्रकार गेले कित्येक वर्षापासून सुरू होता. याबाबत मिळालेल्या माहितीवरून डिझेलच्या साठ्यावर खेड तहसीलदार आणि राज्य दक्षता पथकाने छापा टाकत कारवाई केली आहे.
डिझेल साठा केला सील
तहसीलदार व राज्य दक्षता पथकाने छापा टाकत केलेल्या कारवाईत (Chakan MIDC) चाकण एमआयडीसी परिसरातून सुमारे ३ हजार ६०० लिटर डिझेलच्या साठ्यासह ३६ कंटेनर, २ टँकर, ४ कॉम्प्युटर, १ जनरेटर आणि प्लस्टिक टाक्या व इतर साहित्य आढळून आले. हे साहित्य पथकाने जप्त केले आहे. तसेच बेकायदा साठ्याचा पंचनामा करून खेड तहसीलदार यांच्याकडून डिझेलचा साठा सिल करण्यात आले
९ जणांवर गुन्हा दाखल
बेकायदेशीर डिझेल भेसळीमुळे स्थानिक नागरिकांच्या जीवाला धोका व पर्यावरनाला धोका निर्माण झाला होता. दरम्यान याठिकाणी कंटेनरमध्ये डिझेल भरताना आढळून आल्याने आणि कोणतीही सुरक्षा प्रणाली वापरली जात नसल्याने ९ जणांवर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.