Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News: लग्नामुळे आनंदाने भरलेले घर दुःखाच्‍या खाईत; एकुलत्या एक मुलाचे पंधरा दिवसांवर होते लग्‍न

लग्नामुळे आनंदाने भरलेले घर दुःखाच्‍या खाईत; एकुलत्या एक मुलाचे पंधरा दिवसांवर होते लग्‍न

विनोद जिरे

बीड : एकुलत्या एक मुलाचे लग्न असल्याने घरात आनंदाने तयारी सुरू होती. नातेवाईकांना लग्नाचे आमंत्रण दिले गेले. पण नवरदेव असलेल्या धीरज वसंत तट याला हृदयविकाराचा (Heart Attack) तीव्र झटका आला आणि यात उपचाराला घेवून जाताना त्याचा मृत्यू झाला. यामुळे लग्‍नामुळे आनंदाने भरलेले घर दुःखात बुडाले. (Maharashtra News)

बीडच्या (Beed News) अंबाजोगाई शहरात 26 वर्षीय युवकाचा हृदय विकाराने मृत्यु झाल्याची ह्रदयद्रावक घटना उघडकीस आली. 18 तारखेला ज्याच्या लग्नाचे आमंत्रण मिळाले; त्याच्याच अंत्यविधीसाठी यावे लागण्याची दुर्दैवी वेळ नातेवाईकांवर आली. लग्नाच्या (Marriage) आनंदात असलेल्या कुटुंबावर या घटनेने दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अंबाजोगाई शहरातील बँक कॉलनी परिसरात आपेगाव येथील तट कुटुंब वास्तव्यास आहे. स्थापत्य अभियंता असलेल्या धीरज वसंत तट या एकुलत्या एक मुलाचे लग्न जमले होते. लग्नाचा मुहूर्त 18 डिसेंबरला ठरला होता. लग्न काही दिवसांवर येऊन ठेपल्याने घरात लगीन घाई सुरू झाली. सर्वजण आनंदात होते. काही नातेवाईकांना लग्नाचे आमंत्रण पोचले होते. परंतु नियतीला काही औरच मान्य होत. धीरज यांना हृदय विकाराचा धक्का आला अन्‌ यातच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळळा असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लालबागच्या राजाच्या मंडपात अचानक शॉर्टसर्किट; मोठ्या ठिणग्यांनी भाविकांमध्ये घबराट|VIDEO

Maharashtra Politics: काँग्रेसला मोठा हादरा! बडा नेता भाजपच्या वाटेवर; पक्षप्रवेशाची तारीख ठरली

Maharashtra News Live Update: 7 दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर कोकणवासीयांचा परतीचा प्रवास

बंद असलेले सर्व कबुतरखाने तातडीने सुरू करा; अन्यथा... जैन मुनींचा विधानसभा अध्यक्षांना इशारा

Monday Horoscope: नवीन जबाबदारीपासून आर्थिक नियोजनापर्यंत; वाचा तुमचं राशीभविष्य काय सांगतं?

SCROLL FOR NEXT