BEED NEWS
BEED NEWS SAAM TV
महाराष्ट्र

Beed News : दुर्दैवी! १५ वर्षीय मुलगी कपडे धुवायला शेतातल्या विहिरीवर गेली, घरी परतलीच नाही....

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

विनोद जिरे

Beed News Update : बीडच्या धारूर तालुक्यातील कासार येथे दुर्दैवी घटना घडली. शेतावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय मुलीचा पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेतात कपडे धुण्यासाठी गेलेल्या शाळकरी मुलीचा विहिरीत पडून दुदैवी मृत्यू झाला आहे. ही घटना बीडच्या धारूर तालुक्यातील कासारी येथे घडली. या प्रकरणी दिंद्रुड पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Beed News)

साक्षी ज्ञानोबा कदम (वय 15) असे मृत मुलीचं नाव आहे. साक्षीचे आई-वडील ऊसतोडणीसाठी बाहेरगावी कारखान्यास गेले होते. त्या दरम्यान ती आपल्या चुलत्याकडे राहत होती. (Latest Marathi News)

काल साक्षी शेतात विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेली होती. दुपारी एक ते दीड वाजताच्या सुमारास ती विहिरीत पडली. पाय घसरून विहिरीत पडल्याने तिचा बुडून मृत्यू झाला. विहीर पाण्याने भरलेली असल्याने मृतदेह विहिरीबाहेर काढण्यास अडथळा निर्माण झाला होता.

दरम्यान पोलिसांच्या व गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. या घटनेने कदम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच साक्षीच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut: बारामतीत महाराष्ट्राच्या अस्तित्वाची लढाई... सासवडच्या सभेत संजय राऊतांचे धडाकेबाज भाषण; PM मोदी, अजित पवारांवर टीकास्त्र

Kalyan News: बहिणीचा ड्रायव्हरसोबत प्रेमविवाह; भाऊ संतापला, रागाच्या भरात केलं भयानक कांड

Gulkand Recipe: गुलकंद कसं बनवायचं? एकदम सोपी रेसिपी

GT vs RCB,IPL 2024: गुजरातच्या संघात स्टार फलंदाजाचं होणार कमबॅक; अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११

Tulsi Vastu Tips: तुळशीला सकाळी 'या' वेळी घाला पाणी; होईल आर्थिक लाभ

SCROLL FOR NEXT