Beed News  Saam tv
महाराष्ट्र

Beed Rain : जूनमध्येच बीड जिल्ह्यातील ११ प्रकल्प ओवरफ्लो; १३ दिवसात ३८ मिलिमीटर पाऊस

Beed News : बीडला पाणीपुरवठा करणारा बिंदुसरा प्रकल्प, माजलगाव धरणातही पाणीसाठ्यात वाढ झाली. तर बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणाची पाणी पातळी देखील वाढली आहे

Rajesh Sonwane

योगेश काशीद 
बीड
: मे महिन्यात झालेल्या दमदार अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे अनेक भागातील प्रकल्प, तलावात पाणी साचले आहे. याचा चांगला परिणाम पाहण्यास मिळत असून यंदा बीडमध्ये जून महिन्यातच ११ प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. अर्थात मान्सून पूर्व झालेल्या पावसानं बीडकरांची तहान भागली आहे. 

मागील महिन्यात राज्यातील सर्वच भागात अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले होते. कधी पडला नाही इतका पाऊस मे महिन्यात झाल्याने नदी, नाल्यांना पूर आले होते. बीड जिल्ह्यात देखील मे महिन्यात दमदार पाऊस झाला. यामुळे प्रकल्पांमध्ये पाणी जमा झाले असून या पावसामुळे वर्षभराची पाण्याची चिंता मिटण्याची शक्यता आहे. जूनच्या दुसऱ्याच आठवड्यात जिल्ह्यातील ११ प्रकल्प ओव्हरफ्लो आहेत. तर तीन प्रकल्पांमध्ये ७५ टक्के पेक्षा जास्त साठा झाला आहे.

जिल्ह्यात ३८ मिलीमीटर पाऊस 

बीडला पाणीपुरवठा करणारा बिंदुसरा प्रकल्प, माजलगाव धरणातही पाणीसाठ्यात वाढ झाली. तर बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणाची पाणी पातळी देखील वाढली आहे. १ ते १३ जून या कालावधीत जिल्ह्यात ३८ मिलिमीटर पाऊस झाला. जो सरासरीच्या ४ टक्के इतका आहे.  

शिरूर तालुक्यात मुसळधार, घोड धरण भरून वाहू लागले
पुणे
: सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पावसाने पाठ फिरवली असताना पुण्याच्या शिरूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ७ टीएमसी क्षमतेचं घोड धरण भरून वाहू लागले. सध्या धरणातून घोड नदीपात्रातुन ४ हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. विशेष म्हणजे, गेल्या अनेक दशकांनंतर प्रथमच जून महिन्यात धरण इतक्या मोठ्या प्रमाणात भरल्याने रांजणगावसारख्या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीसह पुणे, अहिल्यानगर ते सोलापूर जिल्ह्यातील बळीराजाला शेती आणि पिण्याच्या पाण्याचा मोठा आधार मिळाला आहे. पावसाच्या या वरदानामुळे संपूर्ण परिसराचा जलसंकट दूर होण्यास मदत झाली. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update :मुंबईचे डबेवाले आजपासून सहा दिवस सुटीवर

लिव्ह-इन रिलेशनशिपमधील जोडप्यांना नवरा-बायको समजलं जाणार? जनगणनेच्या नव्या नियमामुळे चर्चांना उधाण

Heart attack: हार्ट अटॅकपूर्वी दिसणाऱ्या या ५ लक्षणांकडे महिला करतात हमखास दुर्लक्ष; शरीरात होणारे बदल ओळखा

Gold Rate Today: खुशखबर! सराफा बाजार उघडताच सोनं झालं स्वस्त; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Phone Charging Tips : चार्जर नाही, तर काय झाले; 'या' स्मार्ट ट्रिक्स वापरून मिनिटांत मोबाईल फोनची बॅटरी होईल फुल

SCROLL FOR NEXT