बीडमधील मांदगाव परिसरात राष्ट्रवादीचे नेते राम खाडे यांच्यावर १५ जणांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला.
खाडे गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
निवडणुकीच्या काळात राजकीय नेत्यावर हल्ला झाल्याने बीडमध्ये तणाव आणि चर्चा वाढली आहे.
योगेश काशिद, बीड प्रतिनिधी
Political violence in Maharashtra Beed during local body elections : बीडमधील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राम खाडे यांच्यावर प्राणघात हल्ला झाला आहे. दहा ते पंधरा जणांनी धारदार शस्त्रांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केल्याची घटना उघड झाली आहे. या घटनेनंतर बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. हल्ला का केला? याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा शोध घेतला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून बीडमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आता राजकीय नेत्यांवरही हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे.
अहिल्यानगर - बीड जिल्ह्याच्या सीमेलगत मांदगाव जवळ रस्त्यावर खाडे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती मिळाली आहे. या हल्ल्यामध्ये राम खाडे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अहिल्यानगरमधील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. हल्लेखोरांनी राम खाडे यांच्या गाडीवर सुरुवातीला हल्ला केला आणि त्यानंतर धारधार शस्त्राने खाडे यांच्यावर हल्ला झाला. हल्ला कुणी केला कारण काय या संदर्भात अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. प्रचार वेगात सुरू आहे. बीडमध्ये गेल्या काही दिवसांपासून सामाजिक आणि राजकीय वातावरण चांगलेच तापलेय. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. ऐन निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यावर हल्ला झाल्याने कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. हा हल्ल्याचे कारण काय? हल्ला कुणी केला? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
खाडे यांच्या तक्रारीनंतर बीड पोलिसांकडून गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. पोलिसांकडून हल्लेखोराचा शोध घेतला जात आहे. कोणत्या हेतुने हल्लेखोरांनी खाडे यांच्यावर हल्ला केला, याचा पोलिसांकडून तपास केला जात आहे. पोलिसांनी खाडे यांचा जबाब नोंदवला आहे. निवडणुकीच्या काळात बीडमध्ये हाणामारीची घटना घडल्यामुळे राजकीय वर्तुळात याची चर्चा सुरू झाली आहे. हल्लेखोरांना लवकरच शोधून काढू, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.