Sharad Pawar group leader Rajesaheb Deshmukh  Saam Tv News
महाराष्ट्र

Ranjit Kasle : रणजित कासलेंना १० लाख, तर इतर अधिकाऱ्यांना किती कोटी? शरद पवार गटाच्या नेत्याचा सवाल

Rajesaheb Deshmukh on Ranjit Kasle : रणजीत कासले याने आपल्याला धनंजय मुंडे यांनी ईव्हीएमपासून दूर जाण्यासाठी १० लाख रुपये दिल्याचा आरोप केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राजेसाहेब देशमुख यांनी मोठा सवाल केला आहे.

Prashant Patil

योगेश काशिद, साम टीव्ही

बीड : रणजीत कासले याने आपल्याला धनंजय मुंडे यांनी ईव्हीएमपासून दूर जाण्यासाठी १० लाख रुपये दिल्याचा आरोप केल्यानंतर आता परळी विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी मोठा सवाल केला आहे. परळी मतदारसंघात कशा पद्धतीने प्रशासनाचा गैरवापर झाला, याबाबत पोलखोल केली असून एकट्या कासलेला १० लाख रुपये दिले असतील तर इतरांना किती रुपये वाटले असतील? असा सवाल करत परळी विधानसभा मतदारसंघात प्रशासनाचा कशा पद्धतीने गैरवापर झाला, हे समोर येत असल्याचं राजसाहेब देशमुख यांनी म्हटलं असून आता या सर्व प्रकरणाच्या चौकशीसाठी आपण न्यायालयात जाणार असल्याचं देखील देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.

रणजित कासलेंचे खळबळजनक आरोप

निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले काल अखेर पुण्यात दाखल झाले. मात्र, त्यापूर्वी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आणि त्यांनी यावेळी खळबळजनक आरोप आणि मोठे गौप्यस्फोट केले आहेत. बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड असलेल्या वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर आपल्याला मिळाली होती, असा दावा काही दिवसांपूर्वी रणजित कासले यांनी केला होता. त्यानंतर ते काल पुण्यात दाखल झाले होते.

रणजित कासले यांनी पत्रकारांशी बोलताना खळबळजनक आरोप केले आहेत. 'ज्या दिवशी मतदान होते, त्यादेवशी माझ्या बँक खात्यात १० लाख रुपये जमा झाले होते. ईव्हीएमपासून दूर राहण्यासाठी मला हे पैसे देण्यात आले होते', असा दावा कासले यांनी केला आहे. त्यांनी त्यांचं बँक स्टेटमेंट देखील यावेळी दाखवलं आहे. तसेच वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरच्या ऑफरबाबत देखील त्यांनी मोठा दावा केला आहे.

‘मला एन्काऊंटरबद्दल प्रश्न विचारण्यात आले, माझ्याकडे पुराव्याची मागणी करण्यात आली. एन्काऊंटरचा आदेश असा उघडपणे कोणी देईल का? एन्काऊंटरच्या ज्या चर्चा झाल्या, त्या सर्व चर्चा या बंद दाराआड झाल्या, असं रणजित कासले यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मनसेने छापले खास टीशर्ट, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Hockey Asia Cup: पाकिस्तान खेळणार 'आशिया कप', हॉकी संघ भारतात येणार: क्रीडा मंत्रालयाचा हिरवा कंदील

Underi : उंदेरी किल्ला कधी पाहिला का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

Marathi Vijay Melava : "गुजरात फॉर्म्युला महाराष्ट्रात विषासारखा पसरला आहे"; ठाकरेंचा फडणवीस सरकारवर टीकेचा बाण

SCROLL FOR NEXT