Manoj Jarange  Saam tv
महाराष्ट्र

Manoj Jarange: हत्येचा कट कसा रचला गेला? मनोज जरांगेंनी घटनाक्रमच सांगितला; बड्या नेत्याचं नाव केलं उघड

Manoj Jarange On Dhananjay Munde: मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचला गेला होता. यासंदर्भात आज त्यांनी पत्रकार परिषद घेत थेट हत्येचा कट रचणाऱ्या नेत्याचे नाव उघड केले. त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले.

Priya More

Summary -

  • मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यात आला

  • हत्येसाठी अडीच कोटींची सुपारी देण्यात आली

  • मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत केले गंभीर आरोप

  • धनंजय मुंडे यांच्यावर केले आरोप

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचला गेला होता. यासाठी तब्बल अडीच कोटींची सुपारी देण्यात आली होती. या घटनेमुळे सध्या राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यासंदर्भात मनोज जरांगे आणि मराठा समन्वयकांनी जालना पोलिस अधीक्षकांची भेट घेत निवेदन दिले होते. या प्रकरणात बीडच्या परळीमधील राजकीय नेत्याचे नाव समोर येत होते. आता मनोज जरांगे यांनी आज पत्रकार परिषद घेत थेट त्या नेत्याचे नाव उघड केले आहे. मनोज जरांगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांचे नाव घेत त्यांच्यावर गंभीर आरोप केले. त्याचसोबत त्यांनी त्यांच्या हत्येचा कट कसा रचला गेला होता त्याचा संपूर्ण घटनाक्रम पत्रकार परिषदेत सांगितला.

मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये हत्येच्या कटाचा घटनाक्रम सांगितला. ते म्हणाले की, 'त्यांचं अगोदर ठरलं होतं की त्यांना खोट्या रेकॉर्डिंग बनवाव्या. गोळ्या देऊन घातपात करायचं त्यांचं ठरलं होते. बीडचा कांचन नावाचा माणून आहे तो धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता आहे. धनंजय मुंडे माझ्याविरोधात षडयंत्र रचलं. बीडच्या रेस्ट हाऊसमध्ये मोठी बैठक झाली. तिथे धनंजय मुंडे यांनी वेळ दिला. तेव्हा त्यांचं अडीच कोटींमध्ये ठरलं.'

मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत सांगितले की, 'रेस्ट हाऊसमध्ये झालेल्या बैठकीमध्ये धनंजय मुंडंनी काय करायचे सांगितले. संभाजीनगरच्या झाल्टा फाट्यावर २ तास धनंजय मुंडे या दोघांची वाट पाहत थांबला. काही सापडत नाही असे काही तरी चर्चा झाली. यांची वारंवार धनंजय मुंडे यांच्यासोबत भेट झाली.'

तसंच, 'भाऊबीजच्या दिवशी पुन्हा एकदा कट शिजला. आंतरवाली परिसरातील बडे नावाचा माणून आहे. त्याची १०-११ लोकं आहेत. तुम्ही आम्हाला गाडी देऊन द्या आम्ही गाडी ठोकतो असे हे दोघे धनंजय मुंडे यांना म्हणाले. धनंजय मुंडे म्हणाले माझ्याकडे दुसऱ्या राज्यातील पासिंगची जुनी गाडी आहे. करणाऱ्यापेक्षा करून घेणारा धनंजय मुंडे आहे. वंजारी समाजात खूप चांगले लोक आहेत. पण ही असली टोळी संपणं गरजेचं आहे.', असे मत जरांगेंनी व्यक्त केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पनवेल ते सीएसएमटीला जाणाऱ्या लोकलमधून तरुण पडला

Home Loan: घर खरेदी करणाऱ्यांच्या कामाची बातमी! ६० लाखांच्या होम लोनवर वाचवता येणार १९ लाख; ही ट्रिक वापरा

Face Care: रात्री मेकअप रिमूव्ह न करता झोपल्यास काय होते?

GK: तुम्हाला माहितेय का? 'हा' एक देश एका दिवससाठी भारताची राजधानी बनले

Betrayal Indian history: एकाच्या दगाबाजीने बदलला देशाचा इतिहास; कोण होता तो गद्दार राजा?

SCROLL FOR NEXT