BEED ACCIDENT FIVE KILLED IN CAR-ST BUS COLLISION, CCTV VIDEO saam tv
महाराष्ट्र

बीडमध्ये एसटी बस अन् कारची भीषण धडक; पाच जणांचा मृत्यू, परिसरात हळहळ

Beed Majalgaon ST Bus And Car Accident Latest News: बीडच्या माजलगाव तालुक्यात खामगाव-पंढरपूर महामार्गावरील शिंदेवाडी फाट्याजवळ एसटी बस आणि कारची भीषण धडक झाली.

Omkar Sonawane

बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात एसटी बस आणि कारमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील शिंदेवाडी फाट्याजवळ सकाळी 11 वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. कारमधील भाविक तुळजापूरला दर्शनासाठी जात असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

या भीषण अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये काही वेळ वाहने सामान्यपणे ये-जा करताना दिसतात. त्यानंतर एसटी बस महामार्गावरून जात असताना समोरून येणारी कार बसला जोरदार धडक देते. प्राथमिक महितीनुसार, कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे दिसत आहे. धडकेनंतर कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातात कारमधील पाच जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.

या अपघातात गजानन नामदास यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन सुरू केले. खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील माजलगाव-तेलगाव-धारूर मार्गाची दुरवस्था अपघातांना कारणीभूत ठरत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

या मार्गावर अनेक ठिकाणी रस्ता खड्डेमय झाला असून रस्त्याच्या मध्यभागी भेगाही पडल्या आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. रस्त्याच्या बांधकामात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी संबंधित ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे शिक्षक मतदार संघात मोठी राजकीय घडामोड

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! फिटमेंट फॅक्टर 4 झाला तर पगार किती वाढणार? आत्ताच जाणून घ्या गणित

हार्ट अटॅकपासून ते बीपीपर्यंत... सकाळी १ पाकळी लसूण खा आणि 'या' आजारांपासून दूर राहा

Body Tanning Removal Tips: शरीरावर मळ जमा झालाय? मान, कोपर आणि गुडघ्यावरचा काळेपणा दूर करण्यासाठी सोपा उपाय

Video : वाहतूक पोलिसाने मागितली ५ हजारांची लाच; मुंबईतील पोलीस खात्यात खळबळ

SCROLL FOR NEXT