Majalgaon Crime Saam tv
महाराष्ट्र

Majalgaon Crime : पंपावर पेट्रोल देण्यास नकार दिल्याने लोखंडी रॉडने हल्ला; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Beed News : राष्ट्रीय महामार्ग ६१ वरील माजलगाव- गढी मार्गावर असलेल्या व्यंकटेश पेट्रोल पंपावर १४ मार्चच्या दिवशी धुलीवंदन सणाच्या दिवशी बंडू कांबळे यांच्यासह काही कामगार कामावर होते

Rajesh Sonwane

योगेश काशीद 
बीड
: पंपावर पेट्रोल टाकण्यासाठी गेले असताना मोटारसायकलमध्ये पेट्रोल टाकण्यास एका कर्मचाऱ्याने नकार दिला. याचा राग आल्याने तिघांनी शिविगाळ‌ करुन तोंडावर दगडाने मारले. इतकेच नाही तर लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना बीडच्या माजलगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका पेट्रोल पंपावर घडली आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

अगदी क्षुल्लक कारणांवरून मारहाण, हत्या करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशीच घटना बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये घडली आहे. या घटनेत बंडू गुलाबराव कांबळे (रा‌. ब्रम्हगाव, ता. माजलगाव) जखमी झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग ६१ वरील माजलगाव - गढी मार्गावर असलेल्या व्यंकटेश पेट्रोल पंपावर १४ मार्चच्या दिवशी धुलीवंदन सणाच्या दिवशी बंडू कांबळे यांच्यासह काही कामगार कामावर होते. 

पंपावर इंधन विक्री बंद असल्याचे सांगितल्याचा राग 

धुलीवंदनाच्या दिवशी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास संशयित आरोपी  कृष्णा बळीराम कांबळे, अरबाज रहिम पठाण व अर्जुन उर्फ गोट्या पांडुरंग गरड (सर्व रा‌.फुले पिंपळगाव, ता. माजलगाव) हे तीघे बुलेट मोटारसायलवर पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आले‌‌‌‌ होते. यावेळी त्यांनी बंडू कांबळे यांना गाडीत पेट्रोल भर म्हणून सांगितले. यावर धुरवड सण असल्याने माजलगाव परीसरातील सर्व पंपावर इंधन विक्री बंद असल्याचे बंडू यांनी सांगितले. 

माजलगाव पोलिसात गुन्हा दाखल 

अर्थात पेट्रोल भरून देण्यास नकार दिल्याने संशयित आरोपींनी संगनमताने बंडू कांबळे यांच्या तोंडावर दगडाने मारले. तर अरबाज पठाण याने लोखंडी रॉडने हल्ला करुन जखमी केले. सदरची घटना पेट्रोल पंपावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून बंडू कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माजलगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Long Haircuts For Women: लांब केसासाठी 5 युनिक हेअरकट्स, जे करायला सोपे अन् दिसायला भारी

Stroke risk reduction: छोटी चूक ठरू शकते जीवघेणी! तुमच्या 'या' 5 सवयी टाळू शकतात स्ट्रोकचा धोका

Marathi Movie: शिवरायांच्या शौर्य आणि बुद्धिमत्तेचा इतिहास रुपेरी पडद्यावर; रणपति शिवराय या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या अजय बोरस्ते यांची गटनेतेपदी निवड

Mumbai News: ठाकरे बंधूबाबत आक्षेपार्ह पोस्ट, मनसे-ठाकरेसेनेचे कार्यकर्त्यांकडून तरुणाला अर्धनग्न करत मारहाण; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT