Beed Accident  Saam Tv
महाराष्ट्र

भीषण अपघातात दोघे ठार; बीड जिल्ह्यातील घटना

जिल्ह्यात अपघाताची मालिका सुरूच

विनोद जिरे

बीड: बीडच्या धारुर तालुक्यातील तेलगाव आणि भोगलवाडी या दोन ठिकाणी झालेल्या अपघातात (accident), २ ठार तर २ जखमी झाले आहेत. वडवणी तालुक्यातील बाबीतांडा येथून दोन सख्खे भाऊ आदित्य व अभिजित हे दुचाकीवर तेलगावला आले होते. यादरम्यान ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरने (tractor) दुचाकीला जोरदार धडक दिल्यामुळे, झालेल्या अपघातात, आदित्य शंकर राठोड (वय- २०) हा ठार झाला. तर अभिजित शंकर राठोड (वय- २२) हा गंभीर जखमी झाला आहे. (Beed Accident)

हे देखील पाहा-

दुसरा अपघात (accident) धारूर (Dharur) तालूक्यातील सोनीमोहा येथील महादेव साहेबराव तोंडे (वय- ३८) रघुनाथ वैजनाथ तोंडे (वय-४२) हे दोघे भोगलवाडी येथे दुचाकीवर लग्नासाठी जात होते. यादरम्यान भोगलवाडी पाटीवर एका अज्ञात भरधाव कारने दुचाकीला धडक दिली आहे.

या झालेल्या अपघातात महादेव तोंडे यांचा मृत्यू झाला असून रघुनाथ तोंडे हे गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान या दोन्ही अपघाताची नोंद धारूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास धारूर पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Railway Accident : नाशिकमध्ये मोठी दुर्घटना, धावत्या एक्सप्रेसमधून ३ जण पडले, दोघांचा मृत्यू, एक गंभीर

Surya gochar: दिवाळीपूर्वी सूर्य-मंगळाने बनवला खास राजयोग; 'या' राशींच्या घरी येईल लक्ष्मी, घराची भरभराटही होईल

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Maharashtra Rain Alert : दिवाळीवर पावसाचे सावट, पुढील काही दिवस राज्यात कोसळधारा, 'या' जिल्ह्यांना IMD नं दिला इशारा

Gulab Jamun Recipe : सणासुदीला खास बनवा रताळ्याचे गुलाबजाम, १० मिनिटांत खाण्यासाठी तयार

SCROLL FOR NEXT