'मी कर्णधार बनणार होतो पण सचिनमुळे...', युवराज सिंगचं मोठं वक्तव्य

कर्णधारपदाची संधी कशी गमावली याचा धक्कादायक खुलासा
Yuvraj Singh
Yuvraj Singh Twitter
Published On

मुंबई: युवराज सिंग टीम इंडियाच्या (India) स्टायलिस्ट क्रिकेटर्सपैकी एक खेळाडू आहे. जो एकेकाळी त्याच्या उत्कृष्ट फॉर्ममुळे टीम (Team) इंडियाच्या कर्णधारपदाचा सर्वात मोठा दावेदार मानला जात होता. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) कर्णधारपदाची संधी कशी गमावली याचा धक्कादायक खुलासा आता युवराज सिंगने (Yuvraj Singh) केला आहे.

हे देखील पाहा-

सचिनमुळे युवराजची कर्णधार होण्याची संधी गेली!

युवराज सिंगने संजय मांजरेकरांसमोर कर्णधारपद न मिळण्यामागचे मोठे कारण सांगितले आहे. युवराज सिंगने सांगितले की, ग्रेग चॅपल वादात सचिन तेंडुलकरला पाठिंबा दिल्यामुळे त्याला टीम इंडियाचे कर्णधारपद मिळू शकले नाही. बीसीसीआयच्या काही पदाधिकाऱ्यांना युवराज सिंगची ही गोष्ट आवडली नाही आणि याशिवाय त्याला उपकर्णधारपद देखील गमवावे लागले आहे.

हा धक्कादायक खुलासा समोर आला आहे

युवराज सिंग म्हणाला, 'मला कर्णधार व्हायचे होते, त्यानंतर ग्रेग चॅपल आणि सचिन तेंडुलकर यांच्यात वाद झाला, त्यात मी सचिनला पाठिंबा दिला. बीसीसीआयच्या काही अधिकाऱ्यांना ही गोष्ट आवडली नाही. मी ऐकले होते की तो मला नाही तर कोणालाही कर्णधार बनवायला तयार आहे.

Yuvraj Singh
देशात सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात विकलं जातंय; काय आहे दर?

अचानक महेंद्रसिंग धोनीला कर्णधार बनवण्यात आले

युवराज सिंग म्हणाला, '२००७ च्या इंग्लंड दौऱ्यात वीरेंद्र सेहवागसारखा वरिष्ठ खेळाडू संघात नव्हता. त्या काळात मी एकदिवसीय संघाचा उपकर्णधार होतो आणि राहुल द्रविड कर्णधार होता. एकदिवसीय संघाचा उपकर्णधार असल्याने मला वाटले होते की मी कर्णधार होणार आहे, पण अचानक मला उपकर्णधारपदावरून देखील वगळण्यात आले. २००७ च्या T२० विश्वचषकासाठी महेंद्रसिंग धोनीला अचानक कर्णधार बनवण्यात आले होते.

युवराज सिंगला कोणताही पश्चाताप नाही

युवराज सिंग पुढे म्हणाला की, हा निर्णय माझ्या विरोधात गेला असला तरी मला त्याबद्दल कोणताही पश्चाताप नाही. आजही अशी परिस्थिती आली असती तर मी माझ्या संघातील वरिष्ठ खेळाडूच्या पाठीशी उभा राहिला असतो. आम्ही तुम्हाला सांगतो की युवराज सिंह कर्णधार बनू शकला नाही. परंतु, टीम इंडियाला २००७ टी-२० वर्ल्ड कप आणि २०११ वनडे वर्ल्ड कप जिंकून देण्यात त्याने मोठी भूमिका बजावली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com