देशात सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात विकलं जातंय; काय आहे दर?

जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
Petrol Diesel Price Today, Inflation news in Marathi
Petrol Diesel Price Today, Inflation news in MarathiSaam TV
Published On

मुंबई: आज भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल (petrol)आणि डिझेलच्या (diesel) भावात कोणता देखील बदल केला नाही. गेल्या ३३ दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे भाव स्थिर आहेत. दिल्लीबरोबरच बहुतांश शहरांमध्ये पेट्रोलचे भाव १०० च्या पुढे गेले आहेत. याबरोबरच कच्च्या तेलाचा भाव प्रति बॅरल ११३.४६ डॉलरवर पोहोचला आहे. तरीदेखील पेट्रोल आणि डिझेलच्या (diesel) भाव वाढ होत नाही, ही सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारा विषय आहे. (Petrol Diesel Price Today)

हे देखील पाहा-

देशातील सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रातील या शहरामध्ये

देशातील बहुतांश शहरात पेट्रोलचे भाव गगनाला भिडले असताना पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल सर्वात स्वस्त विकले जात आहे. पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोलचे भाव ९१.४५ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे भाव ८५.८३ रुपये प्रति लिटर आहे. शिवाय देशात सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रामधील परभणी (parbhani) येथे १२३.४७ रुपये प्रतिलिटर भावाने विकले जात आहे. तर सर्वात महाग डिझेल आंध्र प्रदेशातील चित्तूरमध्ये १०७.६८ रुपये प्रति लिटर आहे.

Petrol Diesel Price Today, Inflation news in Marathi
देशात पहिल्यांदाच होणार ऑनलाईन जनगणना, अमित शहांची मोठी घोषणा

या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे भाव खालीलप्रमाणे-

दिल्ली -पेट्रोल १०५.४१ रुपये आणि डिझेल ९६.६७ रुपये प्रति लिटर

मुंबई- पेट्रोल १२०.५१ रुपये आणि डिझेल १०४.७७ रुपये प्रति लिटर

चेन्नई- पेट्रोल ११०.८५ रुपये आणि डिझेल १००.९४ रुपये प्रति लिटर

कोलकाता- पेट्रोल ११५.१२ रुपये आणि डिझेल ९९.८३ रुपये प्रति लिटर

नोएडामध्ये- पेट्रोल १०५.४७ रुपये आणि डिझेल ९७.०३ रुपये प्रति लिटर

लखनऊमध्ये- पेट्रोल १०५.२५ रुपये आणि डिझेल ९६.८३ रुपये प्रति लिटर

पोर्ट ब्लेअरमध्ये- पेट्रोल ९१.४५ रुपये आणि डिझेल ८५.८३ रुपये प्रति लिटर

पाटण्यात पेट्रोल- ११६.२३ रुपये आणि डिझेल १०१.०६ रुपये प्रति लिटर

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अ‍ॅप डाउनलोड करा. तसेच ९२२४९९२२४९ वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर एसएमएस करावा लागणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही पेट्रोल डिझेलचे भाव तपासू शकणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com