Beed kej One dies in horrific container accident  Saam Tv News
महाराष्ट्र

Beed Accident : भरधाव कंटेनरची ८-१० वाहनांना धडक, एकाचा चिरडून मृत्यू, नागरिकांनी कंटेनर पेटवला; बीडमध्ये भीषण अपघात

Beed Accident News : बीड जिल्ह्यातील केजमध्ये भीषण अपघाताची घटना घडली असून एका भल्यामोठ्या कंटनरने ८ ते १० गाड्यांना धडक दिली. या घटनेनंतर स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त करत कंटनेरच पेटवला.

Prashant Patil

बीड : बीड जिल्ह्यातील केजमध्ये भीषण अपघाताची घटना घडली असून एका भल्यामोठ्या कंटनरने ८ ते १० गाड्यांना धडक दिली. या घटनेनंतर स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त करत कंटनेरच पेटवला. केजमध्ये कंटेनरनं दिलेल्या धडकेत एकाला चिरडलं असून १५ ते २० जण जखमी झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली. केजहून अंबाजोगाईकडे येत असताना कंटेनरनं लोखंडी सावरगावजवळ इतर गाड्यांना धडक दिल्यानं अपघात घडला, त्यात ८ ते १० गाड्यांना धडक देण्यात आली.

कंटेनरचाचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून १५ ते २० जण जखमी असल्याची माहिती आहे. अपघातातील जखमींवर केज आणि अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गाड्यांना धडक दिल्यानंतर पुढे अंबाजोगाईजवळील लोखंडी सावरगाव जवळ हा कंटेनर पलटी झाला आहे. अपघाताच्या घटनेनं जमाव संतप्त झाला होता. त्यामुळे, कंटेनर पलटी झाल्यानंतर लोखंडी सावरगावजवळ संतप्त जमावाने कंटेनर पेटवला. दरम्यान, कंटेनर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

अपघातातील जखमी व एक मयत

कृष्णा हरिदास कापरे, कापरेवाडी २०

श्रद्धा मधुकर चिंचकर १८ येवता

सुनील सुंदर घुले ५९ केळगाव

बळीराम अप्पराव पांचाळ ४० ढाकेफळ

सोनू बाबु शेख २० केज

विकास वसुदेव काकडे २२ कापरेवाडी

कुमार गायकवाड ५५ देवगाव

शेषेराव मारुती चंदनशिवे ५५ शिरपुरा

सरिता रावसाहेब मुंडे ५७ चारदरी

फुलाबाई धोंडीराम सावंत ६० तुगाव

रावसाहेब यादवराव मुंडे ७० चारदरी

विद्या विलासराव सूर्यवंशी ३० पी

विलासराव ज्ञानोबा सूर्यवंशी ४० पी

सिद्धेश्वर वसुदेव कापरे २२ युसुफवडगाव

सिद्धार्थ शिंदे ५२ (पोलिस) युसुफवडगाव

अतुल बाबुराव कुलकर्णी ४० तांबवा

मीना प्रवीण घोडके ३७ टाकळी/चिंचोली माळी (मयत)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT