स्वच्छ दिलाने एकत्र यायचं ठरवलं तर...; राज ठाकरेंसोबतच्या युतीवर आदित्य ठाकरेंचं 'दिल'से उत्तर

Aaditya Thackeray : राज ठाकरेंनी युतीसाठी टाळी दिल्यानंतर त्याला उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला. पण त्याला बराच वेळ गेला तरी दोन्ही बाजूंकडून काही हालचाली सुरू नव्हत्या. आता या चर्चांना पुन्हा एकदा काहीशी गती मिळण्याची शक्यता आहे.
aaditya thackeray on uddhav raj mns shivsena yuti
aaditya thackeray on uddhav raj mns shivsena yutiSaam Tv News
Published On

छत्रपती संभाजीनगर : मुंबई महापालिकेसाठी शिवसेना ठाकरे आणि मनसे एकत्र येणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात असताना त्यावर आदित्य ठाकरे यांनी मोठं भाष्य केलं आहे. 'महाराष्ट्र हितासाठी जे सोबत येतील आम्ही त्यांच्या सोबत राहू', असं म्हणत आदित्य ठाकरेंनी मनसेसोबतच्या युतीचे संकेत दिले. 'आमचं राजकारण सेटिंगचं नाही तर स्वच्छ दिलाने एकत्र यायचा विचार आम्ही करत असल्याचंही', आदित्य ठाकरेंनी म्हटलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी ते बोलत होते.

राज ठाकरेंनी युतीसाठी टाळी दिल्यानंतर त्याला उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला. पण त्याला बराच वेळ गेला तरी दोन्ही बाजूंकडून काही हालचाली सुरू नव्हत्या. आता या चर्चांना पुन्हा एकदा काहीशी गती मिळण्याची शक्यता आहे. कारण आदित्य ठाकरे यांनी मनसेसोबत युतीचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

aaditya thackeray on uddhav raj mns shivsena yuti
Police Officers Transfers : राज्यातील बड्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची कुठे बदली? वाचा एका क्लिकवर

आदित्य ठाकरे म्हणाले की, 'उद्धव ठाकरेंनी युतीसाठी प्रतिसाद दिला होता. महाराष्ट्र हितासाठी जे कोणी साफ मनाने येतील त्यांना आम्ही सोबत घेऊ. साद-प्रतिसाद, टाळी हे चालूच असतं. पण आम्ही महाराष्ट्र हिताचं बोलतोय. सेटिंगचं राजकारण करणार नाही, आम्ही स्वच्छ दिलाने पुढे येतोय. जे कोणी सोबत येतील त्यांना सोबत घेऊ. मी कोणत्या एका पक्षाबद्दल बोलत नाही', असं आदित्य ठाकरे म्हणाले.

खासदार संजय राऊत यांच्या नरकातले स्वर्ग या पुस्तकावर प्रश्न विचारल्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले की, 'पुस्तकाचे प्रकाशन होऊ द्या, मी पुस्तक वाचलं नाही. संजय राऊत यांनी पक्षासाठी तुरुंगवास भोगला. जे तुरुंगात जाण्यास घाबरले, ते सगळे भाजपच्या वॉशिंगमशीनमध्ये गेले. भाजपने आमचा पक्ष फोडला. ती नीच प्रवृती आहे', असं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

aaditya thackeray on uddhav raj mns shivsena yuti
जिथे नावाचा स्टॅन्ड; तिथेच रोहित शर्माने लगावलेला फटका जाणं हे भाग्याचं, मुख्यमंत्री फडणवीसांची इच्छा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com