Beed Crime News Saam tv
महाराष्ट्र

Beed Crime News : आवादा ग्रीन पवनचक्की कंपनीकडे मागितली २ कोटीची खंडणी, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Beed News : केज पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद देण्यात आली असून कंपनीकडे तब्बल २ कोटी रुपयांची खंडणी वाल्मीक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले यांनी मागितल्याचा उल्लेख आहे.

विनोद जिरे

बीड : बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच पती संतोष देशमुख यांचा पवन चक्कीच्या गोदामात झालेल्या किरकोळ वादातून खून केल्याची घटना घडली होती. यात नवीन ट्विस्ट समोर आला आहे. पवन चक्कीच्या कंपनीकडे तब्बल २ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी बीडच्या केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आवादा ग्रीन पवनचक्कीच्या कंपनीतील शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, २९ नोव्हेंबरला मस्साजोग येथील आवादा एनर्जी प्रकल्पाच्या कार्यालयात विष्णू चाटे यांनी फोन करत वाल्मीकअण्णा बोलणार असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी प्रकल्पाचे काम बंद करण्याबाबत धमकी दिली. तसेच दुपारी सुदर्शन घुले याने कार्यालयात जात पुन्हा काम बंद करण्याची धमकी दिली. तसेच हातपाय तोडण्याची देखील धमकी दिली. 

दरम्यान काही दिवसांनी वाल्मीक कराड यांनी परळी येथील कार्यालयात बोलावून काम सुरू ठेवायचे असेल, तर २ कोटी रुपये द्या असे सांगितले होते. त्यानंतर वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून प्रत्यक्ष- अप्रत्यक्षरीत्या त्यांनी मारहाण करण्याच्या धमकी दिल्या आहेत. तसेच यापूर्वी २९ मे २०२४ ला याच कारणावरून शिंदे यांचे अपहरण देखील झाले होते. त्या प्रकरणात त्यांनी गुन्हा देखील दाखल केला आहे. 

याशिवाय ६ डिसेंबरला सुदर्शन घुले व इतरांनी आवादा कंपनीच्या मस्साजोग येथील प्रकल्पाच्या ठिकाणी जबरदस्ती प्रवेश करून मारहाण केल्याचे म्हटले आहे. त्या प्रकरणात देखील कंपनीच्या शिवाजी थोपटे यांच्या फिर्यादीवरून सुदर्शन घुले व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

शिंदे नामक व्यक्तीकडून केज पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद देण्यात आली असून कंपनीकडे तब्बल २ कोटी रुपयांची खंडणी वाल्मीक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले यांनी मागितल्याचा उल्लेख आहे. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते नव्या बसांना हिरवा झेंडा

माजी पंतप्रधानांच्या बहिणीवर महिलांचा हल्ला, भर पत्रकार परिषदेत अंडी फेकली, नेमकं कारण काय?

आताच तिकिट बुक करा! दिवळीआधी रेल्वेचं मोठं गिफ्ट, तब्बल ९४४ विशेष गाड्या धावणार, वाचा सविस्तर

Anant Chaturdashi 2025: विसर्जनाच्या दिवशी गणपती बाप्पा 'या' राशींना करणार मालामाल; अनंत चतुर्दशीला 4 शुभ महासंयोग देणार पैसा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

SCROLL FOR NEXT