केजचा राष्ट्रवादीचा नगरसेवक निघाला चंदन तस्कर! SaamTvNews
महाराष्ट्र

Beed : केजचा राष्ट्रवादीचा नगरसेवक निघाला चंदन तस्कर!

चंदन तस्करी प्रकरणात केज नगरपंचायतचे नवनिर्वाचित सदस्य बाळासाहेब जाधव यांच्यावर गुन्हा दाखल

विनोद जिरे

बीड : नुकत्याच लागलेल्या नगरपंचायत निकालानंतर विजयाचा उत्सव एकीकडे साजरा करणारे नगरसेवक पाहायला मिळत आहेत. मात्र, बीडच्या (Beed) केज (Kej) नगरपंचायत मधील एका नवनिर्वाचित नगरसेवकाविरोधात, चंदन तस्करी प्रकरणात अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत चंदन तस्करीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळासाहेब जाधव असे नगरसेवकाचे (Corporator) नाव आहे.

हे देखील पहा :

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या समवेतचा त्याचा फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. अंबाजोगाई (Ambajogai) पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून, बाळासाहेब दत्तात्रय जाधव त्याच्या साथीदारांसह वाघाळा शिवारात आंबासाखर कारखाना जवळील देवराव कुंडकर यांच्या शेतातील, पत्र्याच्या शेडमध्ये चंदनाच्या झाडाची चोरी करून, झाड व झाडाचे खोड तपासून गाभा काढत आहे, अशी खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली.

यावरून प्रत्यक्ष कारवाई केली असता 27 किलो चंदनाचा गाभा पकडला असून यावेळी 67 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर, या प्रकरणात देवराव भानुदास कुंडकर, बाळासाहेब दत्तात्रेय जाधव, सतीश या तीन आरोपी विरोधात कलम 379,34,भांदवी सह 26 एफ,41, 42 भारतीय वन अधिनियमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Fasting: गुरुवारी उपवास केल्याने कोणते लाभ होतात?

Maharashtra Live News Update: २८ वर्षीय महिलेचा दीड वर्षाच्या मुलासह विहिरीत आढळला मृतदेह, परभणीतील घटना

Rahul Gandhi : मतचोरीच्या मुद्द्यामुळे माझ्या जीवाला धोका; राहुल गांधींची कोर्टात माहिती

MSRTC: लाडक्या बहिणींची सरकारला रक्षाबंधनाची भेट, ST महामंडळाची ४ दिवसांत सुस्साट कमाई

पालघरमध्ये कुऱ्हाडीने हल्ला; आरोपीला झाडाला बांधलं अन...; धक्कादायक कृत्यानं परिसरात खळबळ|VIDEO

SCROLL FOR NEXT