Beed News Saamtv
महाराष्ट्र

Beed News: ना बिडी, ना दारु, 'या' गावात साधी चहाची टपरीही नाही! व्यसनांपासून चार हात लांब; आदर्श गावाची होतेयं राज्यात चर्चा

Karanji An ideal village: राज्य आणि देशभरातील गावकऱ्यांनी याचा आदर्श घ्यावा, असे म्हणले तर वावगे ठरणार नाही...

विनोद जिरे

Beed Karanji Village News: सध्याची तरुणाई मोठ्या प्रमाणावर व्यसनाधीन होत आहे. ज्यामुळे गुन्हेगारी, मारामाऱ्या अशा घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. व्यसनांकडे तरुणाईचा वाढता कल सर्वांसाठीच चिंतेचा विषय ठरत असताना बीड जिल्ह्यात एक चकित करणारी कौतुकास्पद बाब समोर आली आहे.

बीड जिल्ह्यातील एका गावात दारु, बिडी, तंबाखू इतकेच काय तर चहाची टपरी सुद्धा नसलेले अनोख्या गावाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. व्यसनांना आळा घालणारे हे गाव सध्या राज्यात आदर्श गाव म्हणून कौतुकाचा विषय ठरत आहे. जाणून घेवूया या अनोख्या गावाची संपूर्ण कथा...

आदर्श गाव करंजी...

आतापर्यंत आपण एखाद्या गावात प्रवेश केला की देशी दारूचे दुकानं, येथे तंबाखू, सिगारेट, पान मिळेल. अशा एक ना अनेक व्यसनाच्या साहित्याच्या पाट्या लावलेली दुकाने पाहिले असतील. मात्र बीडच्या (Beed News) आष्टी तालुक्यातील करंजी गाव या व्यसनापासून आणि अशा पाट्यांपासून दूर आहे. या गावात एकही पानटपरी, देशी दारू दुकान, अथवा चहाचे हॉटेल नाही. गावची लोकसंख्या जवळपास 650 च्या घरात आहे. मात्र गेल्या अनेक दशकापासून इथला एकही तरुण अथवा व्यक्ती व्यसनाच्या आहारी गेला नाही. (Latest Marathi News)

भांडण- तंटा मुक्त गाव...

विशेष म्हणजे हीच बिगर व्यसनाची परंपरा आता गावचे सरपंच भरत आजबे यांनी पुढे चालवली आहे. आज या करंजी गावात पाणी फाउंडेशन चे काम एकजूटीने पूर्ण झाली आहेत. लोकांची जिरवण्यात वेळ घालण्यापेक्षा इथला ग्रामस्थ "पाणी आडवा पाणी जिरवा" चा संदेश देताना दिसत आहे. त्यामुळे हे गाव तर पाणीदार झालंच, पण गावात भांडण तंटा हि व्यसनाबरोबर मुक्त झाले आहेत.

दरम्यान बीड जिल्ह्यातच नाही तर देशभरामध्ये व्यसनामुळे गुन्हेगारी वाढली आहे. भावाभावात, गावागावात भांडण होत आहेत. मात्र या व्यसनापासून दूर राहण्यासाठी स्वतः गावकऱ्यांनीच हा अनोखा संकल्प केलाय. आणि गाव गेल्या अनेक वर्षांपासून व्यसनमुक्त आहे. त्यामुळे या गावाची सध्या संपूर्ण राज्यात चर्चा होताना दिसत आहे. तसेच राज्य आणि देशभरातील गावकऱ्यांनी याचा आदर्श घ्यावा, असं म्हटलं तर वावग ठरणार नाही..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra School: पहिलीच्या वेळापत्रकातून हिंदी हद्दपार, सुधारित वेळापत्रक जाहीर

Shukrawar che Upay: शुक्रवारच्या दिवशी 'या' चमत्कारी उपायांनी नशीब उजळेल; करियर-कुटुंबातील अडखळे होतील दूर

Indore Street Food: फक्त पोहेच नाही, इंदूरची 'हे' स्ट्रीट डिशेस देखील आहेत अव्वल दर्जाचे

Maharashtra Live News Update: विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत जाऊन पोहोचली

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

SCROLL FOR NEXT