Abdul Sattar on Sanjay Raut: आमच्या मतावर राज्यसभेवर गेलाय तो महाकुत्रा; राऊतांविषयी बोलताना सत्तारांची जीभ घसरली

Abdul Sattar criticizes Sanjay Raut: शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटातील संघर्ष तीव्र झाला आहे.
Abdul Sattar criticizes Sanjay Raut
Abdul Sattar criticizes Sanjay RautSaam TV
Published On

Abdul Sattar criticizes Sanjay Raut: शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटातील संघर्ष तीव्र झाला आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर कठोर टीका करताना दिसत आहेत. अशातच संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून शिंदे गटावर टीका केली होती. या टीकेवर बोलताना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी संजय राऊत यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका केली आहे. (Breaking Marathi News)

Abdul Sattar criticizes Sanjay Raut
Maharashtra Politics: शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरतील का? शरद पवारांनी केली भविष्यवाणी

संजय राऊत रोज सकाळी उठतो आणि आमच्यावर भुंकतो. त्याची अवस्था कुत्र्यासारखी झाली आहे. असं अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी म्हटलं आहे. यापेक्षाही वाईट शब्द आम्हाला बोलता येतात. आमचं सुद्धा ४०-४२ वर्षांचं राजकारण आहे. ज्या कुत्र्याला आम्ही मतदान करून राज्यभेवर पाठवलं आणि तो आम्हालाच कुत्रा बोलत असेल, तर त्याच्यासारखा महाकुत्रा कुणीही नाही, अशा खालच्या भाषेत टीका अब्दुल सत्तार यांनी केली आहे.

पुढे बोलताना सत्तार म्हणाले, "तो कुत्र्याची नाही जर माणसाची अवलाद असेल तर त्याने राजीनामा द्यावा. त्यांनी राजीनामा द्यावा आणि परत निवडून यावं. मी सुद्धा राजीनामा देतो त्यांनी सुद्धा राजीनामा द्यावा. त्या वेळस तो कुणाची अवलाद आणि कसा आहे हे कळेल तुम्हाला", असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. Maharashtra Political News)

Abdul Sattar criticizes Sanjay Raut
Raj Thackeray News: कर्नाटक निवडणुकीत राज ठाकरेंचं मराठी कार्ड; मतदारांना आवाहन करत म्हणाले, 'उमेदवार कोणताही असो...'

सामना अग्रलेखातून काय टीका करण्यात आली होती?

राष्ट्रवादीत नुकत्याच झालेल्या राजीनामानाट्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र दैनिक 'सामना'मध्ये ‘पवार पुन्हा आले! भाजपचे लॉजिंग-बोर्डिंग रिकामेच’ अशा शीर्षकाखाली अग्रलेख लिहिण्यात आला होता. या अग्रलेखातून राऊतांनी भाजपसह शिंदे गटावर जोरदार टीका केली होती.

'शिवसेना सोडून जे गेले, त्यांची अवस्था उकिरड्यावरील बेवारस कुत्र्यांपेक्षा वाईट आहे. त्यामुळं भाजपच्या खाणाखुणांना भुलून पक्ष सोडणं म्हणजे पायावर धोंडा मारून घेण्यासारखं आहे. जे जातील, त्यांची राजकीय कारकीर्द लोकच संपवतील. मग तो कितीही मोठा सरदार असो, अशी टीका शिवसेनेच्या सामना अग्रलेखातून करण्यात आली होती.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com