Raj Thackeray On Karnataka Election
Raj Thackeray On Karnataka ElectionSaam TV

Raj Thackeray News: कर्नाटक निवडणुकीत राज ठाकरेंचं मराठी कार्ड; मतदारांना आवाहन करत म्हणाले, 'उमेदवार कोणताही असो...'

Raj Thackeray On Karnataka Election: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत कर्नाटकातील मराठी मतदारांना जाहीर आवाहन केलं आहे.

Raj Thackeray On Karnataka Election: कर्नाटकात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीत आपले जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत, यासाठी अनेक राजकीय पक्षांनी जंगी सभा आणि जोरदार प्रचार केला आहे. आज या प्रचाराच्या तोफा थंडावणार असून १० मे रोजी मतदान होणार आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत कर्नाटकातील मराठी मतदारांना जाहीर आवाहन केलं आहे. (Breaking Marathi News)

Raj Thackeray On Karnataka Election
Sharad Pawar on Devendra Fadnavis: कोण पार्सल आहे हे निपाणीतून सांगेन; फडणवीसांच्या त्या टीकेचा पवार घेणार समाचार!

काय म्हणाले राज ठाकरे?

"कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांसाठी येत्या १० मे ला मतदान आहे. तिथल्या सीमाभागातील माझ्या मराठी मतदार बंधू-भगिनींना माझं आवाहन आहे की मतदान करताना एकजुटीने मराठी उमेदवारालाच मतदान करा. उमेदवार कुठल्या पक्षाचा का असेना तो मराठी असायला हवा, आणि त्याने निवडून आल्यावर मराठी भाषेची सुरु असलेली गळचेपी, मराठी माणसांवर सुरु असलेला वर्षानुवर्षांचा अन्याय ह्याविरोधात तिथल्या विधानभवनात वाचा फोडायलाच हवी", असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

"तुम्ही ज्या राज्याचे आहात, त्या राज्याची भाषा, तिथली संस्कृती ह्याचा आदर केलाच पाहिजे, ह्या ठाम मताचा मी आहे. सीमाभागात कित्येक पिढ्या राहणारे बांधव कन्नड भाषा आणि इथली संस्कृती ह्याचा मान राखत आले आहेत. पण तरीही तिथलं सरकार जर मराठी माणसांना त्रास देणार असेल, मराठी भाषेची गळचेपी करण्याचा प्रयत्न करणार असेल तर ते हे खपवून घेतलं जाणार नाही", असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला आहे.

"मध्यंतरी जेंव्हा पुन्हा एकदा सीमावदाला कर्नाटक सरकारकडून खतपाणी घालून वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला होता, तेंव्हा मी म्हणलं होतं की कर्नाटक आणि महाराष्ट्रात मुळात एकजिनसीपणा आहे. इथल्या अनेकांची कुलदैवतं कर्नाटकात आहेत तर अनेक कन्नडिगांची कुलदैवतं महाराष्ट्रात आहेत. थोडक्यात दोन राज्यांतील बंध हा मजबूत आहे".

"तेंव्हा खरंतर कर्नाटक सरकारने सामंजस्याची भूमिका घेतली तर संघर्षाची वेळच येणार नाही. पण कुठल्याही पक्षाचं सरकार तिकडे येऊ दे त्यांच्या वागण्यात यत्किंचितही फरक नसतो. म्हणूनच तिथल्या विधानभवनात मराठी भाषिक आमदार, जो त्या भागातील मराठी अस्मितेचं प्रतिनिधित्व करेल, मराठी माणसांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवेल अशी लोकं असायला हवीत", असं राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी म्हटलं आहे.

"ह्यासाठी सीमाभागातील लोकांना १० मे ला संधी आहे. मराठी आमदारच निवडून येतील हे तुम्ही पाहायला हवं, हे तुमच्या आणि पर्यायाने मराठी भाषेच्या हिताचं आहे. ही संधी दवडू नका", असं जाहीर आवाहन मराठी मतदारांना राज ठाकरे यांनी केलं आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com