Beed Highway Accident News Saam Tv News
महाराष्ट्र

राष्ट्रीय महामार्गावर मृत्यूचं तांडव, कंटेनरनं ६ जणांना चिरडलं, जागीच प्राण सोडले, बीड हादरलं

Beed Highway Horror: बीडच्या नामलगाव फाट्यावर भीषण अपघात. भरधाव कंटेनरखाली सहा जणांचा मृत्यू. मृत पेंडगाव दर्शनासाठी जात असल्याची प्राथमिक माहिती.

Bhagyashree Kamble

  • बीडच्या नामलगाव फाट्यावर भीषण अपघात.

  • भरधाव कंटेनरखाली सहा जणांचा मृत्यू.

  • मृत पेंडगाव दर्शनासाठी जात असल्याची प्राथमिक माहिती.

  • बीड ग्रामीण पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले.

बीड तालुक्यातील धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघाताची घटना उघडकीस आली. नामलगाव फाटा येथील उड्डाणपुलाजवळ भरधाव कंटेनरने ६ जणांना चिरडले. धडक इतकी भीषण होती की, चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील नामलगाव फाटा येथील उड्डाणपुलाजवळ आज सकाळी साडेसातच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. भरधाव कंटेनरचा नियंत्रण सुटले. कंटेनरने सहा जणांना रस्त्यावर चिरडले. या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, दोन गंभीर अवस्थेत होते.

अपघातातील मृत व्यक्ती पेंडगाव येथे दर्शनासाठी जात असल्याची माहिती आहे. मात्र, दर्शनाआधीच अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलिसांना याची माहिती दिली. जखमींना तातडीने बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान, दोघांचाही मृत्यू झाला.

विशाल श्रीकिसन काकडे रा. शेकटे, ता. शेवगाव, जि. अहमदनगर, अमोल नामदेव गरजे, रा. बोधेगाव, ता. शेवगाव, आकाश कोळसे, पवन जगताप आणि किशोर तोर, रा. बाबुलतरा, ता. गेवराई असे मृतांची नावे आहेत. इतर मृतांबाबत माहिती समोर येणं अद्याप बाकी आहे. सध्या पोलिसांना या अपघातातबाबत माहिती देण्यात आली असून, पोलिसांनी तपास करून कंटेनर चालकाला ताब्यात घेतलं आहे.

काही दिवसांपूर्वी गढी उड्डाणपूलजवळ अशाच प्रकारचा भीषण अपघात घडला होता. कंटेनरच्या धडकेत पाच ते सहा जणांचा मृत्यू झाला होता. वारंवार होणाऱ्या अपघातामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara : शेळ्यांसाठी चारा आणायला गेला अन् खड्ड्यात बुडाला; तरुणाचा मृत्यू

Maharashtra Live News Update: पैठण तालुक्यात चार दिवसांपासून मुसळधार

Sanjay Dutt : बॉलिवूडचा मुन्नाभाई झाला बिझनेसमन; मुंबईत सुरू केलं रेस्टॉरंट, पाहा पहिली झलक

Government Scheme: महिलांच्या खात्यात आज जमा होणार ₹१००००, नेमकी योजना आहे तरी काय?

Bank Rules: नवरा-बायकोला एकाच ठिकाणी नोकरीवर बंदी, राज्य सहकारी बँकेने का घेतला निर्णय?

SCROLL FOR NEXT