Beed Heavy Rain Video Saam Digital
महाराष्ट्र

Beed Heavy Rain Video : बीड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट; भर उन्हाळ्यात नदी-नाल्यांना पूर, पाहा VIDEO

Beed Heavy Rain News : दुष्काळी बीड जिल्ह्याला गारपीट, अवकाळी पाऊस आणि वादळाचा तडाखा बसला आहे. संपूर्ण बीड जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. कायम दुष्काळी असणाऱ्या या जिल्ह्यात भर उन्हाळ्यात पूर आला आहे.

Sandeep Gawade

Beed Heavy Rain Video

दुष्काळी बीड जिल्ह्याला गारपीट, अवकाळी पाऊस आणि वादळाचा तडाखा बसला आहे. संपूर्ण बीड जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. कायम दुष्काळी असणाऱ्या या जिल्ह्यात भर उन्हाळ्यात पूर आला आहे. नदी-नाले दुथडी भरून वाहात असून शेतीचं अतोनात नुकसान झालं आहे. वडवणी, धारूर, माजलगाव तालुक्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे.

जवळपास एक ते दीड तास झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीने ओढे, नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तर यामुळं शेतकऱ्यांच्या फळबागांसह पिकांचे देखील आतोनात नुकसान झाले आहे. दरम्यान अगोदरच दुष्काळाच्या खाईत अडकलेल्या शेतकऱ्यांपुढं आता अवकाळी पावसाने नवसंकट उभा केले आहे. हातातोंडाशी आलेला आंबा पीक आता नेस्तनाबूत होण्याच्या मार्गावर आहे. तर कांद्याच्या शेतात पाणीच पाणी झाले आहे.त्यामुळे फळबागांसह नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

वीज अंगावर पडून महिलेचा मृत्यू

सोनपेठ तालुक्यातील मौजे शेळगाव येथे एका शेतात मेंढ्या राखणारी एक ६५ वर्षांच्या महिलेचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला आहे. हरिबाई एकनाथ सुरनर (वय 65 वर्षे रा.सुरणरवाडी ता.परळी जि.बिड) मृत महिलेचं नाव आहे. दुसऱ्या एका घटनेत मौजे शेळगाव येथील शेतकरी गिरीष हालगे या शेतकऱ्याचा आखाड्यावर वीज पडून बैलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे लाखों रुपये नुकसान झाले आहे. सतत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झालं आहे.

अनेक घरांवरचे पत्रे उडून गेले आहेत. झाडे‌ उन्मळून पडली आहेत. सोनपेठ तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे व वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून थेट आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Husband Wife Clash : घटस्फोटित महिला दुसऱ्या पतीकडूनही पोटगीसाठी पात्र; हायकोर्टाचा निर्णय

Vice President Election: उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक गेमचेंजर ठरणार? रेड्डी की राधाकृष्णन, कोण मारणार बाजी?

फोनवर बोलणं, गाणं ऐकणं नकोच! PMPML च्या कंडक्टर- ड्रायव्हरसाठी नवे नियम

Workout Tips: सकाळी व्यायाम करायच्या आधी काय खावे?

Fact Check : कपड्यांच्या शोरूममध्ये भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

SCROLL FOR NEXT