Beed Rain Saam tv
महाराष्ट्र

Beed Rain : गेवराई तालुक्यात ऊस पिकाचे अतोनात नुकसान; मदत वाढवून देण्याची मागणी

Beed News : लाखो हेक्टर शेती पिकांचे यात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अर्थात या नुकसानीमुळे शेतकऱ्यांची भरपाई निघणे कठीण झाले आहे. सर्व क्षेत्र नष्ट झाल्याने होत्याचे नव्हते झाले

Rajesh Sonwane

योगेश काशीद 
बीड
: बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला असून जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात ऊस पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यात शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा आहे. मात्र सरकारने दिलेल्या मदतीने आमचे क्षेत्रही चांगलं होणार नाही. शेती नीट करण्यासाठी तेवढे पैसे आम्हाला पुरणार नाहीत; अशी भावना व्यक्त करत ही मदत सरकारने तत्काळ वाढवून द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. 

बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये कपाशी, तूर, सोयाबीन, ऊस या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून उसाचे पीक चक्क भुईसपाट झाले आहे. लाखो हेक्टर शेती पिकांचे यात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अर्थात या नुकसानीमुळे शेतकऱ्यांची भरपाई निघणे कठीण झाले आहे. शेतातील सर्व क्षेत्र नष्ट झाल्याने होत्याचे नव्हते झाले आहे. 

तात्काळ मदतीची मागणी 

मुसळधार पावसात हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला तात्काळ मदत मिळावी; अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. यातच सरकारने मदत जाहीर केली मात्र ती मदत आम्हाला नुसती शेती नीट करायला लागेल, मग आम्ही वर्षभर काय खायचं आणि कुठून आणायचा? असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. 

चार दिवसापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान
परभणी : मागील चार दिवसापासून परभणी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे. ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने खरीपाच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आला आहे. त्याचा फटका शेतीला बसला आहे. खरिपाच्या पिकाचं प्रचंड नुकसान झालं असल्याने आज पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सेलू तालुक्यातील राजेवाडी या गावी जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चा केली. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : पर्यटनस्थळी फिरायला गेलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याचा घात झाला; आमदारी पॉईंटवरून पडून मृत्यू

CIBIL Score: सिबिल स्कोअर वाढवण्यासाठी 'या' स्मार्ट टिप्स करा फॉलो, कर्ज मिळेल झटक्यात

Bowel Cancer: पोटदुखी, थकवा की आणखी काही... कॅन्सरची नेमकी लक्षणे कोणती? तज्ज्ञांनी काय सांगितलं?

Maharashtra Live News Update: करवीर निवासीनी श्री अंबाबाई देवीची श्री तारा माता रूपात पूजा

Nursery Student Heart Attack: नर्सरीतून घरी येताना ५ वर्षाच्या मुलीला हृदयविकाराचा झटका; बसमध्येच चिमुकलीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT