Sanjay Raut on Gopinath Munde Saam Tv
महाराष्ट्र

Sanjay Raut on Gopinath Munde: 'गोपीनाथ मुंडे असते तर युती आणि नाती तुटले नसती', राऊतांनी व्यक्त केली खंत

पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांचा वारसा टिकवला पाहिजे: संजय राऊत

विनोद जिरे

Sanjay Raut on Sena-Bjp Alliance: ''शिवसेना आणि भाजप हे दोन रक्ताचे भाऊ आहेत, अशी गोपीनाथ मुंडे यांची भूमिका होती. त्यांच्या नंतर सगळीच नाती तुटली. ते असते तर कदाचित युती आणि नाती तुटली नसती, अशी खंत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.

तसेच पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेंचा वारसा टिकवला पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे, असंही राऊत म्हणाले आहेत.

Sanjay Raut on Gopinath Munde: नोटबंदीवर काय म्हणाले राऊत?

नोटबंदीवरच्या निर्णयावर बोलताना राऊत म्हणाले की, ''देशाच्या पंतप्रधानांची इच्छा पूर्ण केली पाहिजे आणि चौका चौकात जाहीर फाशीचे कार्यक्रम राबवले पाहिजे. स्वतःच वधस्तंभाकडे जायला पाहिजे, देशाच्या अर्थव्यवस्थेचा नुकसान झालं. बेरोजगारी वाढवली महागाई वाढवली, व्यापार उद्योग लहान उद्योग बंद पडले. नोटबंदी केल्यामुळे काळा पैसा येईल ती अपेक्षा फोल ठरली.अतिरेक्यांना काळा पैशाचा पुरवठा होतो, तो बंद होईल. काश्मीरला जाऊन बघा काय परिस्थिती आहे,'' असं म्हणत नोटबंदीवरवरून संजय राऊत यांनी मोदींवर निशाणा साधलाय. (Latest Marathi News)

गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले की, ''लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची आठवण इथेच नाहीतर सर्व ठिकाणी येते. जेव्हा जेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात संकट निर्माण होतात. त्या प्रत्येक वेळेला गोपीनाथ मुंडे साहेबांची आठवण होते. विशेषता पंचवीस वर्षापेक्षा जास्त शिवसेना भाजप युतीमध्ये होतो. एकत्र राहिलो कधीकाळी मत भेद झाले असतील. भारतीय जनता पक्षामध्ये हे सर्व मतभेद दुरुस्त करणारे जे मंडळ होतं, त्यात गोपीनाथराव मुंडे होते.''

Shiv Sena -Bjp Alliance: 'तर कदाचित युती तुटली नसती'

ते म्हणाले, ''एक अत्यंत जिंदादिल, दिलदार दिलखुलास, असं राजकारणातल्या व्यक्तिमत्व होतं. शिवसेना-भाजपची युती रहावी आणि ती अखंड टिकावी . हे त्यांचं कायम स्वप्न होतं. जाहीरपणे बैठकामध्ये त्यांनी ती भूमिका मांडली. बाळासाहेब ठाकरे यांच्या वरती त्यांची श्रद्धा होती. ठाकरे परिवाराशी त्यांचे जवळचे संबंध होते. शिवसेना आणि भाजप हे दोन रक्ताचे भाऊ आहेत, अशी त्यांची भूमिका होती.त्यांच्या नंतर ती सगळीच नाती तुटली त्यामुळे त्यांची आठवण येते ते असते तर कदाचित युती तुटली नसती.''

राऊत म्हणाले, ''जो आम्ही पाहिला तो भारतीय जनता पक्ष राहिला नाही. महाराष्ट्रातला आणि देशातला अटलजी आणि आडवाणी यांचा केंद्रातला आणि महाराष्ट्रातला गोपीनाथ मुंडे यांचा भाजप राहिला नाही.''

Pankaja Munde: 'पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांचा वारसा पुढे चालवला पाहिजे'

राऊत पुढे म्हणाले, ''वारसा असतो, मात्र त्या नेतृत्वाची बरोबरी कोणीही करू शकत नाही. बाळासाहेब ठाकरे हे एकच व्यक्तिमत्व, त्यांची बरोबरी कोणी करू शकत नाही. गोपीनाथ मुंडे यांची बरोबरी कोणी करू शकत नाही. पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांचा वारसा पुढे चालवला पाहिजे. गोपीनाथ मुंडे ज्या निर्भयपणे राजकारणात वावरायाचे त्यातून अनेकांना प्रेरणा मिळाली. त्यांनी अनेक कार्यकर्ते नवीन निर्माण केले.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Janhvi Kapoor: हंडी फोडताना 'भारत माता की जय' म्हणल्यामुळे जान्हवी कपूर ट्रोल; अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत सुनावले खडेबोल

Beed Heavy Rain : बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस; अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती, पुरात जीप वाहून गेल्याने ६ जण अडकले

Maharashtra Live News Update: मुसळधार पावसामुळे मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर

High Blood Pressure : हाय ब्लड प्रेशर तर होणारच नाही शिवाय किडनीही निरोगी राहील, फक्त तुमच्या आहारात या गोष्टींचा समावेश करा

FASTag Annual Pass: मुंबई पुणे एक्सप्रेस वे, समृद्धी महामार्ग आणि अटल सेतूवर फास्टॅग पास नाहीच!

SCROLL FOR NEXT