योगेश काशीद/संजय सूर्यवंशी, साम टीव्ही
बीड मधून एक धक्कादायक बातमी समोर आली असून उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांची जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू असतानाच एका मोठ्या अधिकाऱ्याला लाच लुचपत पथकाने 45 लाखाची लाज घेताना पकडले आहे. सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर, विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावार यांना त्यांच्या राहत्या घरी ४५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे जिल्ह्यातील प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
जिल्हा नियोजन समितीची बैठक संपल्यानंतर विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावार हे त्यांच्या निवासस्थानी परतले. याच ठिकाणी त्यांनी तब्बल ४५ लाख रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप आहे. पूर्वनियोजित सापळा रचत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. कारवाईनंतर अधिकाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणी पुढील चौकशी सुरू आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेत भ्रष्टाचाराविरोधात मोठा संदेश गेल्याची चर्चा आहे.
लाचखोर विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावार हे मूळ नांदेडचे आहेत. नांदेड शहरातील आनंदनगर भागात लखमावार यांचे निवासस्थान आहे. याच घरी झाडाझडती घेण्यासाठी नांदेड एसीबीचे पथक दाखल झाले आहे. सध्या त्यांच्या घरी कोणीच नसल्याने एसीबीचे पथक घरा बाहेर थांबून आहे. लाच घेताना मोठा अधिकारी पकडला गेला तर त्याच्या घराची झाडाझडती घेतली जाते. घरातील दागिने, रोख रक्कम, स्थावर आणि जंगम मालमत्तेच्या कागदपत्रांची तपासणी केली जाते. याच कारवाईसाठी एसीबीचे पथक नांदेडच्या निवासस्थानी दाखल झाले. मात्र, या निवासस्थानी श्रीनिवास लखमावार यांचे आई-वडील नाहीत. ते पुण्याला असल्याची माहिती आहे. आता पुढील आदेशाची एसीबीचे पथक प्रतीक्षा करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.