बीड : शेतकऱ्याच्या विधवा पत्नीचे दहा दिवसांपासून स्मशानभूमीत आंदोलन! SaamTvNews
महाराष्ट्र

बीड : शेतकऱ्याच्या विधवा पत्नीचे दहा दिवसांपासून स्मशानभूमीत आंदोलन!

भूसंपादन केलेल्या जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी शेतकऱ्याने स्वतःला पेटवून घेत आत्मदहन केले होते. पतीचा अंत्यविधी ज्या स्मशानभूमीत झाला त्या ठिकाणी कुडकुडत्या थंडीत गेल्या दहा दिवसापासून शेतकऱ्याच्या विधवा पत्नीचे आंदोलन सुरु आहे.

विनोद जिरे

बीड : भूसंपादन केलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा, यासाठी शेतकऱ्याने बीडच्या लघु पाटबंधारे विभागातच स्वतःला पेटवून घेत आत्मदहन केले होते. त्यानंतरही निगरगट्ट प्रशासनाने न्याय दिला नाही म्हणून पतीच्या निधनानंतर शेतकऱ्याची विधवा पत्नी, पतीचा अंत्यविधी ज्या स्मशानभूमीत झाला त्या ठिकाणी कुडकुडत्या थंडीत गेल्या दहा दिवसापासून आंदोलन करत आहे. मात्र, दहा दिवस उलटून देखील प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त करत सामाजिक कार्यकर्त्यांनी मयत शेतकऱ्याच्या घरापासून ते स्मशानभूमी पर्यंत, प्रशासनाची प्रतीकात्मक तिरडी काढून अंत्यसंस्कार केले.

जमिनीचा मोबदला मिळावा म्हणून एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला. तरी देखील प्रशासनाला जाग येत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. न्याय मिळावा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेल्या महिलेची प्रसूती झाली दुसरीकडे महिला स्मशान भूमीत दहा दिवसांपासून बसते. तरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी काय करतात? असा संताप व्यक्त केला जात आहे. माझ्या सासूने थेट मंत्रालयापर्यंत जाऊन निवेदन दिले, पत्रव्यवहार केला, आंदोलन केले, मात्र तरी देखील मोबदला मिळाला नाही. त्यांच्या मृत्यूनंतर माझ्या पतीने देखील शासन दरबारी पाठपुरावा केला, मात्र त्यांना देखील मिळाला नाही.

हे देखील पहा :

म्हणून शेवटी त्यांनी स्वतःला पेटवून घेतले. तर त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर देखील प्रशासनाने फक्त गुन्हा दाखल केला. मात्र आम्हाला मोबदला मिळाला नाही. एक तर मोबदला द्या अन्यथा मुख्यमंत्री साहेब आत्मदहनास परवानगी द्या. असा इशारा तारामती साळुंके यांनी दिला आहे. बीड तालुक्यातील पाली गावात राहणाऱ्या तारामती साळुंके यांच्या पतीने अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाला कंटाळून बीडच्या लघु पाटबंधारे विभागातच स्वतः पेटवून घेऊन आत्मदहन केले होते. याप्रकरणी अधिकाऱ्यांवर गुन्हेही नोंद झाले. मात्र पुढे कसलीच कारवाई झाली नाही. त्यामुळे विधवा पत्नी मागील दहा दिवसांपासून स्मशानभूमीत आंदोलन करत आहे.

परंतु, या दहा दिवसात एकदाही प्रशासकीय अधिकाऱ्याने या ठिकाणी येऊन आंदोलनाची दखल घेतली नाही. त्यामुळे सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत प्रशासनास जाग यावी, यासाठी प्रशासनाची तिरडी काढून स्मशानभूमीतच अंत्यसंस्कार केले आहे. या महिलेला न्याय द्या, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी दिला आहे. गेल्या दहा दिवसापासून न्याय मिळावा या मागणीसाठी स्मशानभूमीत आंदोलनाला बसलेल्या तारामती शिंदे यांची भेट घेतली आहे. त्यांच्यावर तो अन्याय झाला आहे, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महिला आयोग संपूर्ण पाठपुरावा करेल. असे महिला आयोगाच्या सदस्या ऍड.संगीता चव्हाण यांनी सांगितले.

गेल्या चार दिवसापासून स्मशानभूमीत आंदोलनाला बसलेल्या तारामती साळुंखे यांच्या संदर्भात जिल्हाधिकारी यांनी बैठक घेऊन पोलीस अधीक्षक यांनी एक महिन्याच्या आत या प्रकरणाचा संपूर्ण तपास लावला जाईल. असे आश्वासनाचे पत्र घेऊन मी आज तारामती शिंदे यांच्याकडे आलो आहे. त्यांनाही पत्र वाचून दाखवल आहे व आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे. असं पोलीस निरीक्षक देविदास आवारे यांनी सांगितले.

भूसंपादनाचा मोबदला मिळावा यासाठी सासू मरण पावली. यानंतर पतीने कार्यालयासमोर आत्महत्या करुन जीव दिला. परंतु गेंड्याची कातडी पांघरलेल्या प्रशासनाला जाग आली नाही. आता मागील दहा दिवसांपासून पाली येथील विधवा शेतकरी पत्नी तारामती साळुंके यांना रक्त गोठवणाऱ्या थंडीमध्ये ज्या ठिकाणी पतीला आग्नीडाग दिला. त्याच स्मशानभूमीत आंदोलन करावं लागत. हे दुर्दैव आहे प्रशासनाने तात्काळ या महिलेला न्याय द्यावा. अशी मागणी आता सर्व स्तरातून केली जात आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महायुती कोल्हापूर महापालिका निवडणूक एकत्रच लढणार

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

Couples Tips: सुखी संसाराचं सिक्रेट समजलं, नवरा बायकोने रात्री झोपण्यापूर्वी या ५ गोष्टी नक्की करा

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंना जमीन मंजूर पण आमदारकी जाणार? VIDEO

SCROLL FOR NEXT