Beed Crime News Saam tv
महाराष्ट्र

Beed : बीडमध्ये पुन्हा हाणामारी! गुंडांचा व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला, हॉटेलचीही केली तोडफोड

Beed Crime News : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात किरकोळ वादातून हॉटेल व्यवसायिकावर लोखंडी रॉड आणि काठीने प्राणघातक हल्ला करण्यात आला. आरोपींनी हल्ल्यानंतर हॉटेलमध्ये घुसून तोडफोड केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Alisha Khedekar

  • अंबाजोगाई शहरात हॉटेल व्यवसायिकावर लोखंडी रॉडने हल्ला

  • किरकोळ वादातून आरोपींनी बेदम मारहाण केली

  • हल्ल्यानंतर आरोपींनी हॉटेलमध्ये घुसून तोडफोड केली

  • पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे

योगेश काशीद, बीड

बीडमधील अंबाजोगाईत वाढत्या गुंडगिरीचा नंगानाच पाहायला मिळाला आहे. शहरातील एका नामंकित हॉटेल व्यवसायिकावर क्षुल्लक कारणावरून लोखंडी रॉड आणि काठीने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास मोंढा भागातील मुख्य रस्त्यावर घडली. विशेष म्हणजे मारहाण केल्यानंतर हल्लेखोर टोळक्याने मेहता यांच्या हॉटेल मेवाड बिस्ट्रो येथे जाऊन तोडफोड केली. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिसांनी राहुल भारत इदगले याच्यासह त्याच्या साथीदारांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आले आहे.

हॉटेल मालक अविनाश मेहता यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास ते आपल्या मोटारसायकलवरून घरून हॉटेलकडे जात होते. मोंढ्यातील मुख्य रस्त्यावर असताना पाठीमागून आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारने त्यांना ५ ते ७ वेळा हॉर्न दिला. मेहता यांनी बाजूला गाडी थांबवली असता, कारमधील राहुल भारत इदगले आणि एका व्यक्तीने त्यांना खाली उतरून अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

"रस्ता असताना कार का आडवी लावली?" असे विचारले असता, आरोपींनी मेहता यांना लोखंडी रॉड आणि काठीने डोक्यावर, हातावर, पाठीवर आणि पायावर बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. यावेळी मध्यस्थी करणाऱ्या प्रतिक गुत्तेदार या तरुणालाही त्यांनी धक्काबुक्की केली. ही मारहाण सुरू असतानाच पोलिसांनी येण्याची चाहूल लागताच आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. गंभीर जखमी झालेल्या मेहता यांना अनिकेत देशपांडे आणि अफ्रोज पठाण यांनी उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले.

मारहाणीनंतर आरोपींनी मेहता यांचे हॉटेलवर धाव घेतली. तेथे राहुल इदगले, पवार आणि इतर दोन अनोळखी व्यक्तींनी लोखंडी रॉडने खुर्च्या आणि काउंटरची तोडफोड करून सुमारे २० हजार रुपयांचे नुकसान केले. "जर पोलीस ठाण्यात तक्रार केली तर जिवे मारून टाकू," अशी धमकी देऊन आरोपींनी परिसरात दहशत निर्माण केली आणि मेहता यांचा मोबाईल घेऊन पसार झाले. या प्रकरणी मेहता यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Toxic Collection : रक्षाबंधनाला यशच्या 'टॉक्सिक'ने तिकिट खिडकीवर मारली बाजी, तब्बल 'इतक्या' कोटींची बंपर कमाई

India Waterfall : हजारो रुपये खर्च करून दूर कशाला जायचं? 'हा' धबधबा देईल स्वित्झर्लंडचा फील

Mangala Express : भयंकर! शैक्षणिक सहलीसाठी निघालेल्या विद्यार्थ्यांना एक्सप्रेसमध्ये विषबाधा; नेमकं काय घडलं? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आजपासून सुरुवात

Buldhana Accident: बोलेरोची दुचाकीला भयंकर धडक, बापाच्या डोळ्यासमोर मुलाचा मृत्यू, बायकोने प्राण सोडले; बुलढाण्यात हळहळ

SCROLL FOR NEXT