Govind Barge Pooja Gaikwad x
महाराष्ट्र

Pooja Gaikwad : माजी उपसरपंच मृत्यू प्रकरणातील डान्सरचे रील्स व्हायरल, पूजा गायकवाडचे फॉलोवर्स पाचपट वाढले

Govind Barge Pooja Gaikwad : बीडमधील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या मृत्यू प्रकरणात पूजा गायकवाड हे नाव चर्चेत आहेत. यादरम्यान तिच्या फॉलोवर्समध्ये मोठी वाढ झाल्याचे म्हटले जात आहे.

Yash Shirke

  • गोविंद बर्गे मृत्यू प्रकरणानंतर नर्तिका पूजा गायकवाड चर्चेत आली आहे.

  • दोन दिवसांत तिच्या इंस्टाग्राम फॉलोवर्सची संख्या पाचपट वाढली आहे.

  • तिच्या रील्स व्हायरल होत असून सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.

Beed : बीडच्या गेवराईतील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या मृत्यूने मोठी खळबळ उडाली आहे. स्वत:वर गोळी चालवत त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात नर्तिका पूजा गायकवाडचे नाव समोर आले आहे. पूजाने तिचे आणि गोविंद बर्गे यांचे प्रेमसंबंध होते अशी कबुलीही दिली आहे.

पूजा गायकवाडचे गोविंद बर्गे यांच्याशी प्रेमसंबंध होते. बर्गे हे पूजाला महागड्या गोष्टी भेटवस्तू म्हणून देत असत. जसजसे ते गोष्टी देऊ लागले. तसतशी ती वेगवेगळ्या गोष्टी मागू लागली. बार्शीमध्ये पूजा गायकवाडच्या नावावर गोविंद बर्गे यांनी दीड गुंठा जमीन दिल्याचे समोर आले आहे. जमिनीच्या व्यवहाराच्या कागदपत्रांमध्ये बर्गे यांचे नाव आणि सही देखील आहे.

पूजाने गोविंद बर्गे यांच्याकडे बंगल्याची मागणी केली होती. बंगला नावावर करा नाहीतर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करेन अशी धमकी दिली होती, असा आरोप गोविंद बर्गे यांच्या कुटुंबियांनी केला आहे. सततच्या मागणीमुळे, दबावामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप देखील केला जात आहे. या प्रकरणी पूजाला ३ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.

कोण आहे पूजा गायकवाड?

२१ वर्षीय पूजा गायकवाड ही नर्तिका आहे. ती सोलापूरच्या बार्शीतील सासुरे गावची रहिवासी आहे. ती थापडीतांडा गावातील कलाकेंद्रात जात असल्याची माहिती समोर आली आहे. यात ठिकाणी तिची गोविंद बर्गे यांच्याशी भेट दिली. त्यानंतर ती पारगाव कला केंद्रात गेली. तिला भेटायला बर्गे पारगावला जात असत. यातून त्यांच्यामधील संबंध वाढत गेले.

पूजा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे. गोविंद बर्गे मृत्यू प्रकरणामुळे तिच्या नावाची खूप चर्चा होत आहे. या घटनेनंतर पूजाच्या फॉलोवर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी तिचे फॉलोअर्स ५००-७०० होते. आता तिच्या फॉलोवर्सची संख्या ३० हजारांपेक्षा जास्त झाली आहे. ५०० रुपयांची नोट हातात घेत केलेल्या तिच्या रीलची तुफान चर्चा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RBI Rules: रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय! ऑनलाइन पेमेंटच्या नियमात केले बदल; तुमच्यावर काय होणार परिणाम? वाचा

Maharashtra Live News Update : साताऱ्यात जे घडलं ती गुंडगिरी, झुंडगिरी - संजय राऊत

Ginger- Jaggery Tea Recipe: आलं टाकून गुळाचा स्पेशल चहा कसा बनवायचा?

Shocking : भाजप नेत्याच्या मुलाचे सेक्स स्कँडल उघड; २५ हून अधिक मुलींचे शोषण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

WhatsApp Update: खुशखबर! WhatsApp चॅटींगसाठी फोन नंबरची गरज नाही? वाचा नव्या फीचरची संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT