govind barge pooja gaikwad x
महाराष्ट्र

Beed : मोठी बातमी! माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्यासोबतच्या प्रेमसंबंधाची डान्सर पूजा गायकवाडची कबुली

Beed News : गोविंद बर्गे यांनी स्वत:वर गोळी चालवत आयुष्य संपवले. या प्रकरणात पूजा गायकवाडला कोर्टाने ३ दिवसांची कोठडी सुनावली आहे. बर्गे यांच्याशी प्रेमसंबंध असल्याची कबुली पूजाने दिली आहे.

Yash Shirke

  • माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणात पूजाने प्रेमसंबंधांची कबुली दिली.

  • कोर्टाने नर्तिका पूजा गायकवाडला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

  • बर्गे यांच्या आत्महत्येसाठी पूजावर जबाबदारी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

विश्वभूषण लिमये, साम टीव्ही, प्रतिनिधी

Beed Shocking : बीड जिल्ह्याच्या गेवराईतील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. या प्रकरणात नर्तिका पूजा गायकवाडचे नाव पुढे आले आहे. पूजा गायकवाडमुळेच गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान, मोठी माहिती समोर आली आहे. पूजाने गोविंद बर्गे यांच्यासोबत प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्यासोबत आपले प्रेमसंबंध असल्याची कबुली नर्तिका पूजा गायकवाडने दिली आहे. ज्या वेळेस गोविंद बर्गे यांनी स्वत:च्या डोक्यात गोळी घालून आयुष्य संपवले, तेव्हा पूजा सासुरे गावात नसल्याचे समोर आले आहे. त्यावेळेस पूजा गायकवाड ही पारगाव येथील कलाकेंद्रात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पूजा गायकवाडचा कॉल लागत नसल्यामुळे गोविंद बर्गे हे गेवराईवरुन निघाले होते. पूजाला शोधण्यासाठी ते गेवराईहून बार्शी तालुक्यातील वैराग जवळ आले होते. गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड यांच्यामधील कॉल रेकॉर्डिंगवरुन पुढील तपासाची दिशा ठरणार आहे. पूजाला गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणात ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पूजा गायकवाड आणि गोविंद बर्गे यांचे प्रेमसंबंध होते हे समोर आले आहे. पूजा ही वारंवार तिच्या नावावर बंगला करण्यासाठी गोविंद यांच्याकडे तगादा लावून होती. याच कारणामुळे गोविंद यांनी स्वत:च्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या केल्याचे दावा बर्गे यांच्या कुटुंबियांनी केला आहे. या प्रकरणाची चर्चा संपूर्ण राज्यभरात होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काही तरी मोठं घडणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या विरोधात हादरवणारी पोस्ट, जगात खळबळ

NEET paper leak: 'मनी'साठी मनिषांनी फोडला पेपर, पुण्यातील 3 मनिषांचा कारनामा उघड

11th Admission: 11 वी प्रवेशाचा गोंधळ कुणामुळे? सलग दुसऱ्या दिवशी वेबसाईट ठप्प

Diesel Crisis: इंधनाचा पुरेसा साठा, तरीही का होतोय राडा? पेट्रोल पंपांवर रांगा आणि हाणामाऱ्या; पाहा VIDEO

Budh Gochar: 29 मे रोजी बुध करणार स्वराशीत प्रवेश; या 3 राशी एका रात्रीत बनणार गडगंड श्रीमंत

SCROLL FOR NEXT