Beed Crime News  Saam Tv News
महाराष्ट्र

Beed Crime: रात्रीची वेळ, तिघे गावात आले, अचानक हल्ला; असं घडलं बीडचे दुहेरी हत्याकांड

Beed Police: बीडमध्ये लोखंडी रॉड अन् धारधार शस्त्रांनी हल्ला ३ सख्ख्या भावांवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात दोघांचा जागीच मृत्यू झाल तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या दुहेरी हत्याकांडामागचं कारण समोर आले आहे.

Priya More

विनोद जिरे, बीड

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका हत्याकांडाच्या घटनेने हादरला आहे. आष्टी तालुक्यातील वाहीरा गावात लोखंडी रॉड, धारदार शस्त्राने हल्ला करत २ सख्या भावांची निर्घृण हत्या करण्यात आली. तर तिसरा भाऊ गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बीडच्या आष्टी तालुक्यात असणाऱ्या वाहीरा गावात रात्री साडेनऊ ते १० च्या सुमारास घडली.

अजय विलास भोसले, भरत विलास भोसले असे हत्या झालेल्या भावंडांची नावे असून कृष्णा विलास भोसले असे गंभीर जखमी असलेल्या भावाचे नाव आहे. याप्रकरणी ८ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पूर्व वैमनस्यातून ह घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे.

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात असलेल्या वाहिरा या गावात आदिवासी समाजातील नातेवाईकात असलेल्या जुन्या वादातून ही घटना घडली. या घटनेत अजय भोसले आणि भरत भोसले यांचा जागीच मृत्यू झाला. तर कृष्णा भोसले गंभीर जखमी असून त्याला अहिल्यानगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हत्या झालेले दोघे आणि जखमी असलेला कृष्णा हे तिघेही सख्खे भाऊ आहेत. तर हत्या झालेले आणि ज्यांनी हल्ला केला या सर्वांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. दरम्यान या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथकं तयार करण्यात आली आहेत.

आष्टी तालुक्यातील हातोळण येथील अजय विलास भोसले, भरत विलास भोसले, कृष्णा विलास भोसले हे तिघे भाऊ वाहिरा येथे गुरूवारी आले होते. याच ठिकाणी वाहिरा गावातील आणि बाहेरील काही तरुण जमा झाले होते. गुरूवारी दुपारपासून हे सगळे याच ठिकाणी होते. रात्री साडे नऊ ते दहाच्या दरम्यान यातील काही लोकांनी या तिन्ही भावांवर लोंखडी रॉड, धारदार शस्त्राने हल्ला चढवला. या हल्ल्यात अजय विलास भोसले, भरत विलास भोसले या दोन सख्खा भावांचा जागीच मृत्यू झाला. तर तिसरा भाऊ कृष्णा विलास भोसले हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अहिल्यानगर येथे उपचार सुरू आहेत.

तर या घटनतेली सात संशयित आरोपीना अंभोरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर इतर आरोपींचा शोध पोलिस घेत आहे. दरम्यान दोन्ही भावांचे मृतदेह आष्टी ग्रामीण रूग्णालयात ठेवण्यात आले. याप्रकरणी अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास आंभोरा पोलिस करत आहेत. दरम्यान याप्रकरणी आम्हाला न्याय मिळावा, आरोपींना देखील असंच मारावं, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT