Manpada Police : तीन बांगलादेशी महिला घुसखोर ताब्यात; डोंबिवली मानपाडा पोलिसांची कारवाई

Kalyan Dombivali News : डोंबिवलीच्या कोळेगाव परिसरात पाटील चाळीत या तीन महिला वास्तव्यास होत्या. याबाबतची माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकत तिन्ही महिलांना ताब्यात घेतले
Manpada Police
Manpada PoliceSaam tv
Published On

अभिजित देशमुख
कल्याण
: घुसखोरी करून कल्याण- डोंबिवली परिसरात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात पोलिसांची धरपकड मोहीम सुरू आहे. या कारवाईत डोंबिवली मानपाडा पोलिसांनी डोंबिवलीतील कोळेगाव परिसरातून तीन बांग्लादेशी महिलांना अटक केली आहे. मागील अनेक दिवसांपासून या महिलांचे परिसरात वास्तव्य असल्याचे सांगण्यात येत आहे. 

डोंबिवलीच्या कोळेगाव परिसरात पाटील चाळीत या तीन महिला वास्तव्यास होत्या. या महिलांच्या वास्तव्याबाबतची माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकत या तिन्ही महिलांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी केली असता पोलीस तपासादरम्यान या महिलांना मजुरीच्या कामासाठी आणल्याची माहिती पुढे आली आहे.

Manpada Police
KDMC News : आठवडाभरापूर्वी पाईपलाईन फुटली; रहिवाशांना विकत आणावे लागतेय पाणी, तक्रार करूनही केडीएमसीचे दुर्लक्ष

पोलिसांकडून सखोल चौकशी 

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या महिलांबाबत सध्या मानपाडा पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. यात महिलांसोबत आणखी कोणी आहे का? त्यांना कुणी आणले आणि त्यांचे बेकायदेशीर प्रवेश कसे झाले? याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. तसेच त्यांच्याकडील सर्व कागदपत्रांची तपासणी देखील करण्यात येत आहे. यामुळे पोलीस तपासात काय समोर येथे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

Manpada Police
Jalna Corporation : अवैध नळ कनेक्शन धारकांविरोधात आता थेट फौजदारी गुन्हे; जालना महानगरपालिकेला इशारा

पिंपरी चिंचवडमधून दुचाकी चोरटे ताब्यात 

पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरात महागड्या दुचाकी वाहन चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना पिंपरी चिंचवड शहराच्या गुन्हे शाखा क्रमांक 1 पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. तसेच त्यांच्या ताब्यातून ८ दुचाकी वाहन पोलिसांनी जप्त केले असून दुचाकी वाहन चोरीचे ९ गुन्हे उघडकीस आणले आहेत. रफिक उमर जमादार (वय ३७) आणि निलेश मनोहर गायकवाड (वय ३०) अशी दुचाकी वाहन चोरणाऱ्या रेकॉर्डवरील अटल चोरट्यांची नावे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com