Crime News: छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना, गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाच्या अंगावरील पावणेतीन लाखांचे सोने चोरीला

Chhatrapati Sambhaji Nagar Crime: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाच्या अंगावरील सोने चोरल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar Crime
Chhatrapati Sambhaji Nagar CrimeSaam tv
Published On

माणसाच्या संवेदना किती बोथट होत चालल्या आहेत, याची प्रचिती आणणारी घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाच्या अंगावरील सोने चोरल्याने संताप व्यक्त केला जात आहे. मृताच्या टाळूवरील लोणी खाणे म्हणजे काय, याचा प्रत्यय गंगापूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये आला.

मृतदेहावरील पावणेतीन लाखांचे सोन्याचे दागिने व जखमीच्या खिशातील १३ हजार रुपये चोरीस गेल्याने माणसातील संवेदनाच मृत झाल्याचा प्रत्यय आला. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात प्रारंभी पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नाही. त्यानंतर नागरिक व समाजसेवकांनी दबाव निर्माण केल्यानंतर गुरुवारी सायंकाळी सात वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हैदराबाद येथील १४ भाविक मंगळवारी शिर्डी येथे आले होते.

Chhatrapati Sambhaji Nagar Crime
Viral Video: अरे देवा! ऑफिसमध्ये गंमत पडली महागात; नोज रिंग खुर्चीत अडकून महिला अडचणीत, पाहा व्हायरल VIDEO

दर्शन घेऊन ते बुधवारी सकाळी जीपमधून वेरूळ लेण्या पाहून व घृष्णेश्वराचे दर्शन घेऊन गंगापूरमार्गे शिर्डीला जात असताना रात्री १० वाजेच्या सुमारास तांबूळगोटा फाटा येथे त्यांच्या जीपचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात वैद्विक श्यामशेट्टी (६ महिने), अक्षिता गडकुनुरी (वय २१) व प्रेमलता श्यामशेट्टी (५८) व प्रसन्ना लक्ष्मी (४५) यांचा मृत्यू झाला. त्यामुळे गुरुवारी सकाळी मृतांचे नातेवाईक हे गंगापूर येथे आले असता त्यांना मृतांच्या अंगावर असलेले दागिने आढळून आले नाहीत. त्यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडे विचारपूस केली असता त्यांना कोणीही माहिती दिली नाही.

Chhatrapati Sambhaji Nagar Crime
Nanded Crime: मुलींची छेड काढण्यावरून रात्री तामसा येथे दोन गटात वाद, पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेक, चार जण जखमी

यानंतर त्यांनी गंगापूर पोलिसांकडे धाव घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलीस मात्र टाळाटाळ करत होते. मृतांच्या नातेवाईकांनी समाजसेवक अमोल जगताप, राहुल वानखेडे तसेच शिर्डी येथून मदतीसाठी आलेले अरविंद कोते यांच्याकडे मदत मागितली. त्यानंतर पोलिसांना गुन्हा दाखल करावा लागला. याप्रकरणी मनीकंठ रमेश श्यामशेट्टी यांच्या फिर्यादीवरून मृत चुलती, भाची यांच्या अंगावरील २ लाख ७० हजार रुपयांचे सोने व श्यामशेट्टी यांच्या खिशातील रोख १३ हजार रुपये चोरी झाल्याची माहिती आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar Crime
Viral Video: ट्रेनमध्ये दोन महिला भिडल्या; झिंज्या उपटल्या , कपडे फाडले तरी थांबल्या नाहीत, पाहा व्हायरल VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com