Beed district hospital medical negligence case latest update  (AI Photo)
महाराष्ट्र

बीडमधील धक्कादायक प्रकार! सीझरनंतर डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; आईची मृत्यूशी झुंज सुरू

Beed Hospital Negligence : बीड जिल्हा रुग्णालयात १९ वर्षीय नवमातेच्या सीझर शस्त्रक्रियेनंतर पोटात सर्जिकल हातमोजे आणि कागद राहिल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रकृती गंभीर असून महिलेला पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

Bharat Jadhav

  • शस्त्रक्रियेनंतर महिलेच्या पोटात सर्जिकल हातमोजे राहिल्याचा दावा

  • संध्या सूरज गायकवाड यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती

  • वैद्यकीय निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला आहे.

बीडच्या जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणांमुळे एका नवमातेची मृत्यूशी झुंज सुरूय. अवघ्या 19 वर्षांच्या संध्या सूरज गायकवाड या नवमातेच्या सीझर शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांनी निष्काळजीपणा केला. शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांनी मातेच्या पोटात हातमोजे (Surgical Gloves) आणि कागद तसाच सोडून दिला होता. या निष्काळजीपणामुळे ही महिला पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार घेत आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, संध्या गायकवाड यांच्यावर 1 ऑगस्ट रोजी बीड जिल्हा रुग्णालयात सीझर शस्त्रक्रिया झाली होती. शस्त्रक्रियेनंतर ४ दिवसांनी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र घरी आल्यावर संध्या यांच्या पोटात असह्य वेदना सुरू झाल्या, त्यानंतर संध्या यांची प्रकृती सातत्याने बिघडू लागली. कुटुंबीयांनी त्यांना एका खासगी रुग्णालयात नेऊन तपासणी केली. सोनोग्राफी आणि इतर वैद्यकीय चाचण्यांनंतर त्यांच्या पोटात काहीतरी वस्तू अडकल्याचे निष्पन्न झाले.

पुण्यातील ससूनमध्ये शस्त्रक्रिया

संध्या यांच्या पोटात काहीतरी वस्तू असल्याची बाब समोर आल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना पुण्याच्या ससून रुग्णालयात हलवण्यात आले. ससून रुग्णालयात पार पडलेल्या शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांनी संध्या यांच्या पोटातून सर्जिकल हातमोजे आणि कागद बाहेर काढल्याचा खळबळजनक दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केलाय.

निष्काळजी डॉक्टरांवर कठोर कारवाईची मागणी

पीडित महिलेचे पती सूरज गायकवाड यांनी आरोप केला की, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच त्यांच्या पत्नीची ही गंभीर अवस्था झालीय. "मुलीने बाळाला जन्म दिला, पण आज त्याला कुशीत घेण्याचीही तिच्यात ताकद उरलेली नाही. तिला त्रास होत असताना डॉक्टरांनी तिच्याकडे लक्ष दिलं नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT