बीडमध्ये धनगर समाजाचा एस.टी प्रवर्गात समावेश करा, ही मागणी घेऊन धनगर समाज आक्रमक झाला आहे. बीडच्या गेवराई तालुक्यातील खांडवी येथे कल्याण- विशाखापट्टणम महामार्ग आडवत रस्ता रोको करण्यात आलाय. तब्बल दोन तास रस्ता रोको केल्याने, प्रचंड वाहन कोंडी झाली होती. यामुळं महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
दरम्यान, 2014 पूर्वी बारामती येथील आंदोलनादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी आपलं सरकार आल्यावर आपण धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावू, असा शब्द दिला होता. मात्र तो मार्गी लावला गेला नाही. त्यामुळं आज आमच्या समाज बांधवांना 18 दिवसांपासून चौंडी येथे उपोषण करण्याची वेळ आलीय. त्यामुळं धनगर आरक्षणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावा. अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करू, असा इशारा धनगर समाजाचे नेते परमेश्वर वाघमोडे यांनी दिलाय. (Latest Marathi News)
कोल्हापुरात धनगर समाजाच आंदोलन
आरक्षण मिळावं आपल्या या मागणीसाठी शेळ्या मेंढ्या घेऊन आंदोलक कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली या ठिकाणी रस्त्यावर उतरले आहेत.
चौंडी येथे धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी उपोषणसाठी बसलेल्या आंदोलनकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी हे सर्व धनगर बांधव रस्त्यावर उतरून राज्य शासनाचा निषेध नोंदवत आहे. यावेळी जोरदार घोषणाबाजी ही करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.