Dhananjay Nagargoje Facebook Post Saam Tv News
महाराष्ट्र

मला हाल हाल करुन मारतील, बीडमधील आत्महत्या केलेल्या शिक्षकाची फेसबुक पोस्ट; 'त्या' तीन मुंडेंच्या नावाचा उल्लेख

Dhananjay Nagargoje Suicide Facebook Post : श्रावणी बाळा तुझ्या बापूला शक्य झालंच तर माफ कर. बाळा तुझ्या बाबतीत मी खूप स्वप्न पाहिली होती पण त्या स्वप्नांना स्वप्नातच ग्रहण लागलं.

Prashant Patil

बीड : बीडमधील दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे आणि सतत होणाऱ्या गुन्हेगारीमुळे महाराष्ट्र हादरला आहे. अशीच एक धक्कादायक घटना काल समोर आली आहे. बीडमध्ये एका शिक्षकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या शिक्षकाने तब्बल १८ वर्ष शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम केलं. पण इतके वर्ष काम करूनही वेतन काही मिळालं नाही. त्यामुळे या शिक्षकाने आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. पण आत्महत्येच्या आधी दोन दिवसांपासून त्यांनी 'विषय संपला, विषयाला पूर्णविराम. मी जगणं कधीचच सोडलेलं आहे. बघू पुढे भविष्यात काय काय होतंय ते' अशी पोस्ट फेसबुकवर केल्याचं समोर आलं आहे. आत्महत्या केलेल्या शिक्षकाचं नाव धनंजय अभिमान नागरगोजे असं आहे.

धनंजय अभिमान नागरगोजे यांची फेसबुक पोस्ट

श्रावणी बाळा तुझ्या बापूला शक्य झालंच तर माफ कर. बाळा तुझ्या बाबतीत मी खूप स्वप्न पाहिली होती पण त्या स्वप्नांना स्वप्नातच ग्रहण लागलं. बाळा या नालायक राक्षस लोकांनी माझा अंधातून खूप छळ केला. विक्रम बाबुराव मुंडे, विजय विक्रम मुंडे, अतुल विक्रम मुंडे आणि त्यांचे कार्यकर्ते उमेश रमेश मुंडे, गोविंद नवनाथ आव्हाड, ज्ञानेश्वर राजेभाऊ मुरकुटे या सर्वांना माझा खूप छळ लावला. मला हे हाल हाल करुन मारणार आहेत. मी फक्त विचारलं होतं की, तुमच्या शाळेवर गेली १८ वर्षे झाल काम करतोय. अजून मला पगार नाही, आता पुढे काय करायचं? त्यावर विक्रम मुंडे म्हणाले तू फाशी घे म्हणजे तू मोकळा आणि मी पण तुझ्या जागेवर दुसरा कर्मचारी भरायला मोकळा. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानंतर या लोकांनी मला त्रास द्यायला सुरुवात केली. श्रावणी बाळा हे सर्व राक्षस आहेत, या राक्षसांमुळेच मी तुझ्यापासून दूर जात आहे. अशी फेसबुक पोस्ट नागरगोजे यांनी लिहिलीय.

कोण आहेत धनंजय नागरगोजे

धनंजय अभिमान नागरगोजे बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील केळगाव येथील रहिवासी आहेत. ते मागील १८ वर्षांपासून विना अनुदानित आश्रमशाळेत शिक्षक म्हणून काम करत होते. १८ वर्षांपासून काम करत असूनही वेतन मिळत नसल्याच्या कारणातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे. २०१९ मध्ये राज्य सरकारने या शाळेला २० टक्के अनुदान घोषित केलं होतं. मात्र त्याची अंमलबजावणी झालीच नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT