Beed Crime विनोद जिरे
महाराष्ट्र

बीडच्या रेवकी देवकीत झोपेतच अल्पवयीन मुलीचा मृत्यू; खून झाल्याची परिसरात चर्चा...

शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर होणार पुढील कारवाई

विनोद जिरे

बीड: बीडच्या गेवराई तालुक्यातील रेवकी देवकी परिसरातील गायरणात, काही पारधी समाजातील कुटुंब राहत आहेत. त्या ठिकाणी एका मुलीचा खून झाल्याची माहिती, गेवराई (Gevrai) पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली. मात्र, कुटुंबातील व्यक्तींनी आमची मुलगी झोपेतच मृत्यू पावल्याचे सांगितले. मात्र, त्यानंतर पोलिसांनी (police) सदरील अल्पवयीन मुलीचा मृतदेह ताब्यात घेत, गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात (hospital) शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.

हे देखील पहा-

मयुरी नवनाथ चव्हाण (वय- 14) रा रेवकी देवकी असे त्या मयत अल्पवयीन मुलीचे नाव आहे. काल मयुरी हि घरातील बाजेवरच मृत अवस्थेत आढळून आल्याने खळबळ माजली होती. तसेच याठिकाणी सकाळी वाद देखील झाला असल्याची माहिती आहे. दरम्यान खून झाल्याची चर्चा झाल्याने, पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र, कुटुंबातील व्यक्तींनी हा खून नसून आमची मुलगी झोपेतच मरण पावल्याचे सांगितले आहे.

मात्र, त्यानंतर गेवराई पोलिसांनी 14 वर्षीय मयुरीचा मृतदेह गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. दरम्यान शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे, पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या गुढ मृत्यूने गेवराई परिसरात खळबळ उडाली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fake Notes : नकली नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तीन जाणांविरोधात गुन्हा दाखल

Train Ticket Conformation Tips : दिवाळीला गावी जायचंय, पण तिकीट कन्फर्म नाही, 'या' टिप्स करा फॉलो

निवडणूक आयोगाला 2 लाखांचा दंड; सुप्रीम कोर्टाचा जोरदार दणका, काय आहे प्रकरण? VIDEO

Maharashtra Live News Update: - धुळे येथील बंधाऱ्याच्या भिंतीची उंची अधिकाऱ्यांनी कमी केल्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना फटका

MPSC Exam 2025 Date : महत्वाची बातमी! MPSC परीक्षा पुढे ढकलली, आता या तारखेला होणार परीक्षा

SCROLL FOR NEXT